Crime News : फैजानने आपली राहुल अशी ओळख सांगून एका तरुणीसोबत मैत्री केली. दोघांच्या मैत्रीचे प्रेमसंबंधात रुपांतर झाले, मात्र या नातेसंबंधाचा गैरवापर करत फैजानने पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची धमकी दिली. जर कोणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याबाबत ब्लॅकमेल केलं. ही घटना उत्तर प्रदेशातील अग्रा येथील शमसाबादची आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कोचिंग क्लासमध्ये 10 वीच्या विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून अत्याचार, दुसऱ्या शिक्षकाने काढला व्हिडिओ
फैजानने राहुल अशी सांगितली ओळख
मनसिक तणावात येऊन तरुणीने रविवारी पीडित तरुणीनं किटकनाशक औषध पिऊन जीवन संपवलं. आरोपी फैजान विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पोलीस ठाणे परिसरातील आहे. एका मैत्रिणीने तरुणीची फैजानशी ओळख करून दिली होती. फैजानने आपली ओळख राहुल सांगून खरं नाव लपवून ठेवलं.
मैत्रीचा फायदा घेत तरुणीला केलं ब्लॅकमेल
मुलीचे आणि तिच्या मैत्रिणीचे हायस्कूल बोर्ड परीक्षेचे केंद्र दूर होते. राहुल उर्फ फैजानने तिला अनेकदा शाळेजवळ सोडवले होते. तिचा मोबाइल क्रमांक देखील घेतला होता. त्याने पीडितेचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ मिळवले होते. नंतर तरुण पीडितेला सतत फोनकरून भेटण्यास बोलावू लागला होता. तरुणीने भेटण्यास नकरा देताच, तो व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील देऊ लागला होता.
तरुणीला समजले की, आरोपीचं खरं नाव फैजान असे आहे. तो नेहमी मानसिक तणावात होता, आरोपीद्वारे व्हिडिओ व्हायरल करण्याची सातत्याने धमकी देऊ लागला होता. पोलिसांनी पीडितेला समजावले, नंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे पीडित तरुणी अगदी भयभीत झाली होती.
हे ही वाचा : रॅपिडो चालकाचे अश्लील कृत्य, 'तसले' व्हिडिओ पाहताना महिला प्रवाशानं रेड हँड पकडलं
मुलीने नैराश्यात येऊन किटकनाशक पिऊन संपवलं जीवन
रविवारी सकाळी मुलीला समजावण्यात आलं होतं, मात्र तरीही मुलीने नैराश्यात येऊन किटकनाशकाचं औषध प्यायलं. घटनेची माहिती मिळताच, एका रुग्णालयात पीडितेला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आरोपी पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. संबंधित प्रकरणात आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT












