Crime News : पतीने कुऱ्हाडीचे वार करुन बायकोची निर्घुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बायकोचा खून केल्यानंतर हा आरोपी पती फरार झालाय. स्वप्ना असं मृत्यू महिलेचं नाव असून पती असलेला नरेश या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. ही घटना तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील अलेरू गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, नरेश आणि स्वप्ना यांना दोन मुलं आहेत. दाम्पत्य किराणा दुकान आणि चिकन सेंटर चालवत होते. काही काळापासून त्यांचा परिवार आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे घरात सतत भांडणं आणि कलह सुरू झाले होते. मोठा मुलगा आई-वडिलांशी वाईट पद्धतीने वागत होता. यामुळे पती-पत्नीमधील मतभेद आणखी वाढले.
हेही वाचा : पत्नी करायची नको ते काम! पतीला भनक लागताच नातेवाईकांसोबत मिळून रचला मोठा कट अन् नंतर...
दोघांमध्ये नेहमी वाद होत असतं
आरोपी नरेशला हळूहळू आपल्या पत्नीवर संशय येऊ लागला होता. त्याचं वागणं मानसिक रुग्णासारखं झालं होतं. प्राथमिक तपासात पोलिसांना समजलं की पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत असत. मोठा मुलगा अधिक हट्टी आणि उद्धट होत चालला होता. तो आई-वडिलांचं ऐकणं बंद केलं होतं, आणि त्याचं कारण त्याची आईसोबतची जवळीक होती, असं बोललं जात आहे.
हेही वाचा : Personal Finance: PPF किंवा NSC नाही, 'या' स्किममधून तुम्हाला मिळतील जबरदस्त पैसे!
पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार
मोठ्या मुलाच्या वागण्यावरुन नरेश आणि स्वप्ना यांच्यात पुन्हा वाद झाला, त्यातच नरेशने संतापाच्या भरात पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. घरात उपस्थित असलेल्या त्याच्या मुलांनी आणि इतर नातेवाइकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही आणि त्याने भीषण कृत्य केलं. नेल्लिकुदुरुचे सीआय सत्यनारायण यांनी सांगितले की, नरेशने रागाच्या भरात पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला.
त्या वारामुळे स्वप्नाचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले की मोठ्या मुलावरून झालेल्या वादामुळेच ही हत्या झाली आहे. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या मृतदेहगृहात पाठवण्यात आलं आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी नरेशच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather: कोकणातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी
ADVERTISEMENT
