दारु पिऊन एसटी चालवली म्हणून गुन्हा दाखल झाला, अन् चालकाने बसमध्येच गळफास घेतला; आहिल्यानगरमधील घटना

ST Bus driver ended his life : दारु पिऊन बस चालवली म्हणून गुन्हा दाखल झाला अन् चालकाने एसटी बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली.

Mumbai Tak

मुंबई तक

03 Oct 2025 (अपडेटेड: 03 Oct 2025, 02:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दारु पिऊन बस चालवली म्हणून गुन्हा दाखल झाला

point

चालकाने एसटी बसमध्येच गळफास घेऊन आयुष्य संपवलं

ST Bus driver ended his life, Ahilyanagar : दारु पिऊन एसटी बस चालवल्यामुळे एका बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, यामुळे बस चालक नैराश्यात गेला. त्यानेच त्याच बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) तारकपूर बसस्थानकात घडली. सुरेश चंद्रभान धामोरे (वय 54, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचं नाव आहे. बस चालकाविरोधात दारु पिऊन बस चालवल्याप्रकरणी तोफखान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हे वाचलं का?

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, राणेंच्या कट्टर विरोधकाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

फिर्यादींना चालक धामोरे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय 

अधिकची माहिती अशी की, तारकपूर बसस्थानकात कार्यरत असलेल्या शिवाजी मारुती खजिनदार यांनी चालक धामोरे यांनी मद्यप्राशन केल्याची माहिती दिली होती. बुधवारी धामोरे यांची बसस्थानकात ड्युटी होती. बस क्रमांक एमएच 40 एन 8887 ही गाडी चालक धामोरे आणि वाहक अजय पुंडलिक यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांना तारकपूर ते घोसपुरी अशा दोन फेऱ्यांची जबाबदारी देण्यात आली होती. दोन्ही फेऱ्या पूर्ण करून ते सायंकाळी साधारण पाचच्या सुमारास तारकपूर बसस्थानकात परतले. त्यावेळी फिर्यादींना चालक धामोरे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आला. ही बाब त्यांनी आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांच्याकडे कळवली. कर्तव्यावर असताना दारू पिऊन वाहन चालवल्यास प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून धामोरे यांना तोफखाना पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.

हेही वाचा : पुणे : टीव्ही बंद करुन माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक, वडिलांनी काम सांगताच मुलगा संतापला; जन्मदात्याला संपवलं

आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर रात्री उशिरा चालक धामोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर धामोरे यांनी बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विसर्जनावेळी मोठा अनर्थ! ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली अन् थेट तलावात, 13 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये 10 लहान मुलांचा समावेश

 

 

    follow whatsapp