Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि बापाने मिळून एक वर्षाच्या चिमुकलीला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पोस्ट मार्टम रिपोर्टनं डॉक्टरांसह नागरिकही हादरुन गेले आहेत. या रिपोर्टनुसार, चिमुकलीच्या शरीरावर 13 हून अधिक जखमा आढळून आल्या. तिची अनेक हाडं मोडली आहेत. डोकं आणि छातीच्या आतील भागात रक्तस्त्राव झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : साताऱ्यात अघोरी प्रकार, घर फोडून जिमचे साहित्य चोरीस, नारळ,पान, हळदी कुंकूसह... परिसरात भीतीचं वातावरण
‘असं’ आहे संपूर्ण प्रकरण
रविवारी रात्री वडील मोहम्मद अक्रम आणि सावत्र आईने चिमुकलीला अमानुष मारहाण केली. इतकंच नाही तर यानंतर तिला रात्री कडाक्याच्या थंडीत घराच्या गच्चीवर सोडून दिले. यानंतर ती बेशुद्ध झाल्याचे कळताच तिला वडील आणि आईने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सोमवारी पहाटे तीन वाजताच तिचा मृत्यू झाला होता. याआधी शनिवारीही त्या चिमुकलीला मारहाण केली होती.
हे ही वाचा : पुणे तिथे काय उणे! मतदारांना वाटल्या 'चांदीच्या' भेटवस्तू, पण निघाल्या खोट्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रताप...
आजोबांनी दाखल केली तक्रार
चिमुकलीच्या मृत्यूनंतर तिचे आजोबा मोहम्मद जहीर यांनी गाझियाबादमधील वेव सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिमुकलीला क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. तसेच हॉस्पिटलमध्ये प्रकरणाशी संबंधित असलेली कागदपत्रे तपासली जात आहेत. एसपी प्रियाश्री पाल यांनी सांगितले की, आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. पुढील कारवाई सुरु आहे.
ADVERTISEMENT











