सख्ख्या भाचीला आपल्या खोलीत घेऊन गेला अन्... असा मामा कोणालाही न मिळो!

crime news : जासिम नावाच्या तरुणाने माणुसकीच्या नावाखाली राक्षसी रुप धारण केलं. त्याने आपल्याच भाचीसोबत जे काही केलं, ज्यात पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला, त्याच्या कृत्याने नात्याला कलंकीत केलं. जासिमने आधी आपल्या 4 वर्षांच्या भाचीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिची निर्घृणपणे हत्या केली.

crime news

crime news

मुंबई तक

20 Apr 2026 (अपडेटेड: 20 Apr 2026, 01:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माणुसकीच्या नावाखाली तरुणाचं राक्षसी रुप

point

4 वर्षांच्या भाचीवर लैंगिक अत्याचार

Crime News : उत्तर प्रदेशातील जासिम नावाच्या तरुणाने माणुसकीच्या नावाखाली राक्षसी रुप धारण केलं. त्याने आपल्याच भाचीसोबत जे काही केलं, ज्यात पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला, त्याच्या कृत्याने नात्याला कलंकीत केलं. जासिमने आधी आपल्या 4 वर्षांच्या भाचीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले. संबंधित घटना 11 एप्रिल रोजी उघडकीस आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोन्यासारखी पत्नी असताना नवऱ्याचे अनैतिक संबंध, वर्षाभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणीने सर्वांची झोप उडवली

नात्यातील पावित्र्याचा जासिमकडून भंग 

जासिमने नात्यातील पावित्र्याचा भंग केला. तिला चॉकलेट विकत घेण्याच्या बहाण्याने आपल्याच भाचीचे अपहरण केले. नंतर निष्पाप चिमुरडीला खोलीत घेऊन गेला, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिचा गळा दाबून हत्या केली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त समोर आले. 

सीसीटीव्ही फुटेजमधून जासिमचा लज्जास्पद प्रकार उघडकीस

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने शालिमार गार्डनर परिसरातील एका गाडाखाली मृतदेह सोडून दिला. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून जासिमचा हा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला. 19 एप्रिल रोजी, जासिम आणि त्याचे साथीदार बंथला कॅनल कटजवळ दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेव्हा पोलिसांच्या स्वॅट पथकाने घटनास्थळी धाव घेत पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गुन्हेगारांनी अंदाधुंद गोळीबार केला.

हे ही वाचा : Astrology : मे महिन्यात रूचक योग, मंगळ ग्रहाच्या चालीमुळे 'या' राशीतील लोकांवर पैशांचा पडणार पाऊस

याच प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जासिमला गोळी लागली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला. या चकमकीत हेड कॉन्स्टेबल आणि पोलीस कर्मचारी इक्बाल जखमी झाले. कॉन्स्टेबल मोहित शर्मा यांचा जीव त्यांच्या बुलेट-प्रुफ जॅकेटमुळे वाचला.