मित्रांसह भावाशी संबंध ठेवण्यास टाकला दबाव, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन... पीडितेनं सांगितला घटनेचा थरार

मुंबई तक

• 12:39 PM • 28 Mar 2026

crime news : तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. एवढंच नाहीतर तिच्यावर धर्म परिवर्तनास दबाव आणण्यात आला. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भावासह मित्रांशी संबंध ठेवण्यास दबाव टाकला

point

पीडितेला धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती

point

आरोपीला पोलिसांनी केलं अटक

Crime News : तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. एवढंच नाहीतर तिच्यावर धर्म परिवर्तनास दबाव आणण्यात आला. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी जनसेवा केंद्र मोहम्मद फराजला अटक केली. पीडितेनं या प्रकरणाबाबत जानकीपुरम ठाणे परिसरात तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणीची शाळेपासून ओळख होती. आरोपीने तरुणीशी अधिक जवळीकता वाढवली आणि आपल्या जाळ्यात ओढलं. 15 ऑक्टोबर 2025 रोजी मोहम्मद फराज तरुणीला जानकीपुरम येथील 60 फूटाच्या रोडवरील एका हॉटेलात घेऊन गेला, त्याने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक शोषण केलं. 

हे ही वाचा : नागपूर : रेल्वे रुग्णालयात लोको पायलटने गळफास घेत संपवलं जीवन, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

भावासह मित्रांशी संबंध ठेवण्यास दबाव टाकला

यादरम्यान, आरोपीने एक व्हिडिओ देखील बनवल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, नंतर तरुणीचे शोषण सुरुच ठेवले. आरोपीने तिच्यावर त्याच्या मित्रांशी आणि भावाशी संबंध ठेवण्याचा दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप पीडितेनं केला. 

'धर्म स्वीकारला तर तिच्याशी विवाह करेन'

पीडितेला आरोपीने तिला सांगितलं की, जर तिने धर्म स्वीकारला तर तो तिच्याशी विवाह करेल. तसेच, तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती, नंतर तिचा मानसिक छळ केला होता. 22 मार्च रोजी त्याने संबंधित व्हिडिओ मुलीच्या वडिलांना आणि ओळखीच्या लोकांना पाठवला, नंतर त्याने स्क्रीनशॉट काढून ते डिलिट केले. पीडितेला धमकी दिली की, जर तिने पोलिसांना तक्रार दाखल केल्यास तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ठार मारले. 

हे ही वाचा : पुणे : राम जन्मोत्सव मिरवणुकीदरम्यान, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने महिलेचा मृत्यू

आरोपी अटकेत

जानकीपुरम पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार तिवारी यांनी सांगितलं की, गुरुवारी एफआरआय दाखल करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत शुक्रवारी सलीम तिराहजवळून आरोपी मोह म्मद फराजला अटक केली. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.