Crime News : हरियाणातील पानीपत आणि सोनीपत या दोन जिल्ह्यांत झालेल्या चार चिमुकल्यांच्या सलग हत्यांनी संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. वर्षानुवर्षे ‘अपघात’ म्हणून समजल्या गेलेल्या या मृत्युंच्या मागे एक थरकाप उडवणारा सत्य दडलेलं असल्याचं पोलिस तपासात उघड झालं. या सर्व हत्या एकाच महिलेने म्हणजेच 32 वर्षीय पूनमने केवळ सुंदर मुलांबद्दलच्या मत्सरातून केल्याचं उघड झालं आहे.
ADVERTISEMENT
‘सुंदर मुलांबद्दल मत्सर, म्हणून हत्या’ , पोलिसांपुढे कबुली
पानीपत पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीत पूनमने धक्कादायक कबुलीजबाब दिला. तिच्या मते तिला विशेषतः मुलींच्या सौंदर्यामुळे प्रचंड हेवा वाटायचा. आश्चर्याची बाब म्हणजे, तिने ज्या चार मुलांना मारलं त्यात तिचा स्वतःचा तीन वर्षांचा मुलगाही होता. पोलिसांनी सांगितलं की, संशय आपल्यावर येऊ नये म्हणून तिने मुलींबरोबरच स्वतःच्या मुलालाही मारलं.
पूनमने हत्या करण्यासाठी घरातील पाण्याच्या टाक्यांचा वापर केला. पाणी हेच सर्वात सोपं आणि निःशब्द माध्यम असल्याचं तिला वाटायचं. बळी पूर्णपणे बुडला आहे याची खात्री करण्यासाठी ती बारीक लक्ष ठेवत असे, ज्यामुळे मृत्यू निश्चित होई.
सासरच्या बाजूने दुसरीच स्टोरी
सोनीपत येथील सासरवाडी मात्र चौकशीत वेगळी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार पूनम अनेकदा आपला आवाज बदलून एखाद्या पुरुष आत्म्याने आपल्यात प्रवेश केल्याचा दावा करत असे. “मी तीन मुलांना मारलंय” असं ती कधी कधी सांगत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय पूनमचा संपर्क उत्तर प्रदेशातील कैरान्यातील एका तांत्रिकाशीही असल्याचं तपासात समोर आलं.
सलग चार हत्यांची थरारक मालिका
1) पहिल्या दोन हत्या – 2023 : स्वतःचा मुलगा आणि नणंदेची मुलगी
2023 मध्ये पूनम भावड गावातील ससुरालमध्ये होती.
शुभम (वय 3 वर्षे) – स्वतःचा मुलगा
इशिका (वय 9 वर्षे) – नणंदेची मुलगी
दोघांनाही तिने घराच्या पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं. दोन्ही मृत्यू अपघात म्हणून कुटुंबीयांनी स्वीकारल्याने कोणीही शंका घेतली नाही.
2) तिसरी हत्या – ऑगस्ट 2025 : चुलत भावाच्या मुलीचा बळी
माहेर म्हणजे सिवाह गावात राहत असताना तिने जिया (वय 6 वर्षे) हिला पाण्याच्या टाकीत ढकलून बुडवून मारलं. काही नातेवाईकांना संशय आला होता, परंतु पुरावे नसल्याने गोष्ट दाबून टाकण्यात आली.
3) चौथी हत्या – 1 डिसेंबर 2025 : विधीचा खून अन् सगळंच उघड
नौल्था गावात नातेवाईकांच्या लग्नावेळी तिने विधी (वय 6 वर्षे) हिला वेगळं नेलं. छतावरील स्टोअररूममध्ये प्लास्टिकच्या टबात तिची मान दाबून ती मारून टाकली. दरवाजाला बाहेरून कुलूप लावून ती खाली उतरली आणि स्वतःच्या भिजलेल्या कपड्यांबद्दल खोट्या कहाण्या सांगत राहिली. पण विधी सापडत नसल्याने कुटुंबाने शोध सुरू केला आणि अखेर स्टोअररूममध्ये मुलीचा मृतदेह आढळला. टब आधी बाथरूममध्ये असतो, तो स्टोअररूममध्ये कसा आला, हा पहिला मोठा पुरावा ठरला. पोलिसांनी एकेकाची चौकशी केली आणि अखेर कडक प्रश्नात पूनम खचली. तिने चारही हत्यांची कबुली दिली.
मत्सर, कमीपणाची भावना आणि विकृत मानसिकता
चौकशीत पूनमने सांगितले की, पहिल्या बाळाच्या जन्मानंतर घरातील काही मंडळी तिच्या मुलाचं इतर मुलांइतकं सुंदर नसल्याचं बोलायची. या टोमण्यांनी तिच्या मनातनं कमीपणाची भावना खोलवर पक्की झाली. हळूहळू ही भावना मत्सर, चीड आणि अखेरीस हिंसक प्रवृत्ती मध्ये बदलली. तपासात पुढे आलं की, तिच्या लक्ष्यावर कुटुंबातील आणखी दोन मुलं होती, ज्यात तिचा केवळ 18 महिन्यांचा दुसरा मुलगाही होता.
कायदेशीर कारवाई सुरू
जिया हिचा खून ‘अपघात’ नसल्याचं स्पष्ट झाल्याने तिचे वडील दीपक यांनी पानीपतच्या औद्योगिक ठाणे सेक्टर 29 मध्ये हत्या गुन्हा नोंदवला आहे. पूनमवर आता चारही हत्या प्रकरणांत पुढील कठोर कारवाई सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











