Crime News : हरियाणाच्या फरीदाबाद येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने शिक्षिकेवर चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. कथित आरोपीने शिक्षिकेवर तब्बल 27 वेळा चाकूने प्राणघातक हल्ला करत संपवलं. मृत शिक्षिकेचं वय 30 होते. तर आरोपीची अमित अशी ओळख समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पिक्चरमध्ये काम देण्याचा बहाणा, हॉटेलवर बोलावून गुंगीचं औषध मिसळत अत्याचार
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेला अमित नावाचा एक तरुण सातत्याने त्रास देऊ लागला होता. यापूर्वी देखील आरोपीने मृत महिलेला अनेकदा त्रास दिला होता, संबंधित प्रकरणाच पोलिसांनी तक्रार दाखल केली. संबंधित प्रकारणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. व्हिडिओत एक तरुण दिसत असून तो पीडितेची वाट पाहत आहे.
आरोपीकडून महिलेवर चाकूने सपासप वार
त्याच ठिकाणी एक तरुण घटनास्थळी येतो, इतक्यातच आरोपी इकडे तिकडे पाहून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळानंतर संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून निघून जातो. चेहऱ्यावर मुखवटा परिधान केलेला तरुण तिथेच उभा होता. शिक्षिका घटनास्थळी दाखल होताच, आरोपीने महिलेवर चाकूने सपासप वार केले. व्हिडिओत शिक्षिकेच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. पीडितेची आरोळी ऐकून एकजण घटनास्थळी मदतीसाठी येतो.
हे ही वाचा : पिक्चरमध्ये काम देण्याचा बहाणा, हॉटेलवर बोलावून गुंगीचं औषध मिसळत अत्याचार
27 वेळा चाकूने वार करत शिक्षिकेला संपवलं
मात्र, तोवर आरोपीने पीडित शिक्षिकेवर चाकूने तब्बल 27 सपासप वार केले, नंतर घटनास्थळावरून तो फरार झाला. ही घडलेली घटना व्हिडिओमध्ये कैद झाली. या घटनेनं परिसर हादरून गेला असून घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ADVERTISEMENT












