दलित महिलेचा निर्घृण अंत, कुटुंबीयांचा बलात्कार आणि हत्येचा आरोप

मुंबई तक

• 04:34 PM • 01 Nov 2023

उत्तर प्रदेशामध्ये एका महिलेला शेजारच्या घरात बोलवून तिची बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही महिला दलित असल्याने आता भीम आर्मी आक्रमक झाली आहे.

dalit woman dies after getting trapped in mill uttar pradesh family alleges rape

dalit woman dies after getting trapped in mill uttar pradesh family alleges rape

follow google news

UP Crime : उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका दलित महिलेचा (Dalit women) छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह (Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सापडलेल्या मृतदेहामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे जोरदार गोंधळ उडाला असून सरकारविरोधात घोषणआही देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी गावातील तिघांविरोधात बलात्कार (Rape) आणि हत्या (Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.(dalit woman dies after getting trapped in mill uttar pradesh family alleges rape)

हे वाचलं का?

भीम आर्मी आक्रमक

या प्रकरणाचा तपास करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीमला घेऊनच तपासाला सुरुवात केली. मात्र पोलिसांनी या महिलेचा मृत्यू अपघाताने झाल्याचे सांगितले. मृत महिला दलित असल्याने भीम आर्मीच्या नेत्यांनी घटनास्थळी येऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे. भीम आर्मीकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘असले बाजारचाळे करू नका…’, जरांगे-पाटील संतापले; कोणावर उठवली टीकेची झोड?

बलात्कारानंतर महिलेची हत्या

छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेल्या दलित मिहिलेच्या मृतदेहामुळे वातावरण तणाग्रस्त बनले होते. कुटुंबीयांनी सांगितले की, महिलेला कामाच्या निमित्ताने शेजारील गिरणीच्या घरात बोलवले होते. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. मृतदेह सापडल्यानंतर तिच्या कपड्यांवर आणि शरीरावर रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे कुटुंबीयांनी बलात्कारानंतर महिलेची हत्या केल्याचे सांगितले. यावेळी कुटुंबीयांनी घटनास्थळी प्रचंड गोंधळ घातला होता, आणि यावेळी त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली.

गिरणीत अडकून झाला मृत्यू

ही घटना घडल्यानंतर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस उपअधीक्षक नितीन कुमार यांनी सांगितले की, 40 वर्षीय महिला शेजारच्या मिलमध्ये काम करत होती. त्यावेळी यंत्रामुळे तिचा त्यात मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने फॉरेन्सिक टीमला घेऊन तपास सुरु केला.

    follow whatsapp