उच्चभ्रू वस्तीतील वृद्ध दांपत्याची हत्या, प्लंबरने स्क्रू ड्रायव्हर भोसकला; मोलकरणीसोबत काय केलं?

मुंबई तक

• 09:48 AM • 07 Oct 2026

एका प्लंबरने वृद्ध दांपत्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्या दांपत्याच्या मदतीसाठी गेलेल्या घरकामगार महिलेचीही त्याने हत्या केली. या ट्रिपल मर्डरमुळे डेहराडून हादरुन गेले आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

उच्चभ्रू वस्तीतील वृद्ध दांपत्याची हत्या

point

प्लंबरने स्क्रू ड्रायव्हर भोसकला

point

मोलकरणीसोबत काय केलं?

Crime News : डेहराडूनमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरकामाचे अवघे 300 रुपये देण्यावरून झालेल्या वादातून एका प्लंबरने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या मदतीला धावून आलेल्या घरकामगार महिलेची स्क्रू ड्रायव्हरने भोसकून निघृण हत्या केली. मंगळवारी (6 ऑक्टोबर) घडलेल्या या ट्रिपल मर्डरच्या घटनेमुळे परिसर हादरून गेला असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी प्लंबरला अटक केली आहे.

हे वाचलं का?

स्क्रू ड्रायव्हरने भोसकले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या दोन वर्षांपासून के. एस. कपूर (वय 80) आणि त्यांच्या पत्नी रजनी कपूर (वय 76) यांच्या घरी प्लंबिंगचे काम करत होता. मंगळवारी तो प्लंबिंगच्या कामासाठी कपूर दांपत्याच्या घरी गेला होता. काम पूर्ण झाल्यानंतर 300 रुपयांच्या मोबदल्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, चिडलेल्या राजकुमारने स्क्रू ड्रायव्हरने वृद्ध दांपत्यावर प्राणघातक हल्ला केला.

हे ही वाचा : उल्हासनगर : गर्भवती महिला ट्रॅफिक जाममध्ये अडकली, रिक्षात दिला बाळाला जन्म

घरकाम करणाऱ्या महिलेवरही हल्ला

या घटनेदरम्यान शेजारी काम करणारी तिलिया देवी (वय 55, मूळ रा. दरभंगा, बिहार) ही महिला आरडाओरड ऐकून मदतीसाठी कपूर यांच्या घरात धावून आली. मात्र, आरोपी राजकुमारने तिच्यावरही स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक लोकांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी राजकुमारला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गंभीर जखमी अवस्थेत तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा : विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेणार का? मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं?

सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?

या घटनेची माहिती मिळताच देहराडूनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून हत्येसाठी वापरलेला स्क्रू ड्रायव्हर आणि एक सोन्याची साखळी हस्तगत केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही आरोपी हत्येपूर्वी घराकडे जाताना दिसत आहे. सुरुवातीला हा प्रकार दरोड्याचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तपासात 300 रुपयांच्या वादातूनच ही घटना घडल्याचे निष्पन्न होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.