विवाहित बीएसएफ जवानाचे अनैतिक संबंध, बायकोला कुणकुण लागली अन् घडलं भयंकर

मुंबई तक

• 12:27 PM • 17 Jul 2026

एका विवाहित बीएसएफ जवानाने प्रेयसीची हत्या केली आहे. मात्र हे प्रकरण या हत्येपुरतंच मर्यादित राहिलं नाही. यापुढंही एक भयानक गोष्ट घडली. डेहराडूनमधील ही घटना काय आहे, जाणून घ्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाहित बीएसएफ जवानाचे अनैतिक संबंध

point

बायकोला कुणकुण लागली अन् घडलं भयंकर

Crime News : एका बीएसएफ जवानाने त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हा जवान विवाहित होता. प्रेयसीच्या आर्थिक मागण्यांमुळे तो वैतागला होता. अखेर त्याने प्रेयसीला संपवण्याचा कट रचला. प्रमेंद्र नेगी असे आरोपी जवानाचे नाव आहे. त्याने या हत्येचा कट कसा रचला आणि त्यानंतर काय घडलं जाणून घेऊया.

हे वाचलं का?

बायकोला लागली कुणकुण

उत्तराखंडच्या डेहराडून परिसरातील ही घटना आहे. आरती असे प्रमेंद्रच्या प्रेयसीचे नाव होते. तीदेखील विवाहित होती. दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. याची कुणकुण प्रमेंद्रच्या बायकोला लागली होती. यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. प्रमेंद्रची बायको अनेकदा आरतीला समजावण्यासाठी तिच्या घरीही गेली होती. मात्र आरती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अशातच आरतीने प्रमेंद्रकडे तिच्या आर्थिक मागण्या वाढवल्या. यामुळे त्रस्त होऊन प्रमेंद्रने तिला संपवण्याचा घाट घातला.

हे ही वाचा : “रँचो आणि सोनम वांगचूक यांचा काहीही संबंध नाही, पण”, आमिर खान थेट बोलला

कसा रचला कट?

सुट्टीवर आल्यावर प्रमेंद्रने आरतीला फिरायला नेले. त्याठिकाणी दोघं एका होमस्टेमध्ये थांबले होते. याचदरम्यान त्याने आरतीला संपवण्याचं निश्चित केलं. बुधवारी (15 जुलै) त्याने आरतीची विष देऊन हत्या केली. मात्र हे प्रकरण इथंच संपणारं नव्हतं. आरतीची हत्या केल्यानंतर प्रमेंद्रने त्याच्या बायकोला मोबाईलवर लोकेशन पाठवले आणि फोन करुन सांगितले की, त्याचे ज्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तिला त्याने संपवले असून स्वतःही विष प्राशन केले आहे. पत्नीने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दीला बट्टा! 48 वर्षीय महिलेवर पीएसआयने केला बलात्कार

हत्येमागचं नेमकं कारण काय?

पोलीस जेव्हा दिलेल्या लोकेशनवर पोहोचले, तेव्हा प्रमेंद्र खोलीत बेशुद्धावस्थेत पडला होता आणि आरतीचा मृतदेह तिथेच होता. पोलिसांनी तात्काळ प्रमेंद्रला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, आरतीची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तिचा पती एका गंभीर आजाराने ग्रस्त असून कसाबसा कुटुंबाचा गाडा ओढत होता. यामुळे आरती वेळोवेळी प्रमेंद्रकडे पैशांची मागणी करत असे. यामुळे प्रमेंद्र प्रचंड मानसिक तणावाखाली होता. सध्या आरोपी जवानाची प्रकृती स्थिर होत असून, त्याचा अधिकृत जबाब नोंदवल्यानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येईल.