नवी दिल्लीः दिल्लीतील कार स्फोटाच्या तपासात एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या Hyundai i20 कारमध्ये स्फोट झाला ती आतापर्यंत अनेक वेळा विकली गेली होती. याचबरोबर या कारचं पुलवामा कनेक्शनही समोर आलं आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या या कार स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
खळबळजनक… स्फोट झालेली कारची झालीय अनेकदा विक्री!
तपास यंत्रणांना असे आढळून आले आहे की ही i20 कार अनेक वेळा खरेदी-विक्री करण्यात आली होती. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ती पुलवामा येथील रहिवासी तारिकला विकण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, कारच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे (Fake Documents) वापरली गेली होती, ज्यामुळे कारच्या खऱ्या मालकाची ओळख अद्याप अस्पष्ट आहे. या फसवणुकीमुळे स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्यांच्या हेतूंबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतं आहे.
यापूर्वी, ही कार हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी सलमानची असल्याचे वृत्त होते, ज्याने ती विकली होती. ही कार गुरुग्राममध्ये नोंदणीकृत होती. 20 सप्टेंबर 2025 रोजी फरीदाबादमध्ये चुकीच्या पार्किंगसाठी कारला दंड देखील ठोठावण्यात आला होता.
दिल्ली स्फोटानंतर सुरक्षा आणि तपास यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. फॉरेन्सिक पथके घटनास्थळी तैनात आहेत आणि स्फोटाचे केंद्र असलेल्या कारच्या अवशेषांची कसून तपासणी करत आहेत.
स्फोट घनता चाचणीचा प्राथमिक उद्देश स्फोटक पदार्थाचे स्वरूप आणि स्फोटात वापरलेले रसायने निश्चित करणे आहे. यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या हुंडई i20 कारमध्ये स्फोट झाला.
10 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ येताच सायंकाळी 6.52 वाजता कारमध्ये भीषण स्फोट झाला. ज्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचेही समजतं आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भागात स्फोट झाला तो भाग बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात वर्दळीचा असतो. लाल किल्ला मेट्रो स्टेशन 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 साली बांधण्यात आले होते आणि तेव्हापासून स्टेशनवर ऑटो-रिक्षा, ई-रिक्षा आणि कार पार्क केल्या जात आहेत. लोक स्टेशनमधून बाहेर पडताना चांदणी चौक किंवा चावडी बाजारात जाण्यासाठी या ई-रिक्षा आणि ऑटो-रिक्षांचा वापर करतात. मेट्रो स्टेशनजवळील स्फोट हा एक मोठी घटना असल्याने गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
तपासाची दिशा
एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये स्फोटापूर्वी एक पांढऱ्या रंगाची इको व्हॅन दिसत आहे. पथक वाहनाच्या नोंदणी तपशीलांचा आणि हालचालींचा मागोवा घेत आहे. स्फोटात वापरल्या गेलेल्या स्फोटकांच्या रासायनिक अहवालासाठी नमुने सीएफएसएलकडे पाठवण्यात आले आहेत. दिल्ली आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागात संशयास्पद वाहनांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











