पत्नीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, बॉयफ्रेंडला हाताशी धरून केला खून, मृतदेह किचन वट्याखाली पुरला, त्याच घरात तिच्याशी...

extramarital affairs : पती-पत्नीच्या नातेसंबंधात अनैतिक संबंधांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशातच आता एका पत्नीनं आपल्या बॉयफ्रेंडला हाताशी धरून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

extramarital affairs

extramarital affairs

मुंबई तक

06 Nov 2025 (अपडेटेड: 06 Nov 2025, 02:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

एका वर्षानंतर पोलिसांनी केला खूनाचा तपास 

extramarital affairs : पती-पत्नीच्या नातेसंबंधात अनैतिक संबंधांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशातच आता एका पत्नीनं आपल्या बॉयफ्रेंडला हाताशी धरून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्याच पतीला किंचनच्या ओट्याखाली परल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. खूनानंतर तब्बल वर्षानंतर यामागचं खरं सत्य सर्वांसमोर उघड झालं आहे. ही घटना अहमदाबाद येथील रामोल परिसरातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : रितेश भाऊच्या सिनेमात भाईजानची एंट्री, 'राजा शिवाजी' सिनेमात सलमान खान साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका

नेमकं काय घडलं? 

संबंधित प्रकरणात खून करण्यात आलेल्या पतीचं नाव मोहम्मद इसराईल अकबरअली अन्सारी असे नाव आहे. याचा विवाह 2015 मध्ये रुबी नावाच्या महिलेशी झाला होता. दोघेही अहमदाबाद येथे राहायला आले होते आणि अन्सारी मिस्त्री म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुलेही आहेत. 

दोघांचाही सुखाचा संसार सुरु होता, पण यात अकबरभाई वाघेला या व्यक्तीसोबत रुबीचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते. अशातच पती इसराईल हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे पाहून रुबीने आणि तिच्या बॉयफ्रेंडसह काही लोकांनी मिळून त्याचा काटाच काढला. अन्सारीच्या खूनानंतर आरोपींनी घराच्या स्वयंपाकघरातील किचनच्या ओट्याखाली खड्डा आणण्यात आला आणि त्यात मृतदेह पुरण्यात आला होता. त्यावर सिमेंटसह फरशा बसवण्यात आल्या आणि पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा : कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश

एका वर्षानंतर पोलिसांनी केला खूनाचा तपास 

या घटनेचा तब्बल एका वर्षानंतर खुलासा झाला. अहमदाबाद गुन्हे शाखेनं इमरान वाघेला याला ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. तसेच मृतदेह कुठे पुरला याबाबतही माहिती दिली. पोलिसांनी त्या ठिकाणा खणून पाहिले असता, तिथे हाडे, केस आणि काही अवशेष आढळून आले. या प्रकरणी आता पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच रुबी आणि इतर दोन आरोपीचा शोध सुरु आहेत. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.

अशातच आता पत्नी रुबी आणि तिचास बॉयफ्रेंड वाघेला अटक केली आहे. तसेच इतर दोन आरोपी मोहसीन पठाण (20) आणि रहीम शेख (22) या आणखी दोन आरोपींना अटक केल्याचे वृत्त आता समोर आलं आहे. 

    follow whatsapp