लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळून पत्नी बॉयफ्रेंडसोबत छू....बाई काय हा प्रकार?

extramarital affair : लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यानंतर एका नवविवाहित महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत रात्रीच पळून गेली. तिनं आपल्या सासरच्या लोकांच्या लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळल्या आणि मध्यरात्रीच तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळ काढला आहे. दरम्यान, एक्स्ट्रा मॅरिटलच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत.

 extramarital affair wife

extramarital affair wife

मुंबई तक

21 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 12:17 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या 2 महिन्यानंतर महिला बॉयफ्रेंडसोबत गेली पळून

point

सासरच्यांच्या लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळल्या अन् डाव साधला

extramarital affair : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या 2 महिन्यानंतर एक नवविवाहित महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत रात्रीच पळून गेली. तिनं आपल्या सासरच्या लोकांच्या लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळल्या आणि मध्यरात्रीच तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळ काढला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. या घटनेनं तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : हसावं की रडावं? पत्नी बॉयफ्रेंडला भेटायला गेल्यानं पतीनं चावलं पत्नीचं नाक अन्....

लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळल्याने सासरचे बेशुद्ध

लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळल्याने सर्वचजण बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. याचाच फायदा घेत तिनं मध्यरात्रीच पळ काढला. घराच्या भोवताली असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आणि सुनेचे प्रताप समोर आले आहेत. एवढेच नाही,तर महिलेनं आपल्यासोबत रोख रक्कम आणि दागिने सोबत घेतले. या प्रकरणात दीराने वहिनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सारवा गावातील असल्याची माहिती समोर येत आहे. पतीचं नाव सलमान असे असून सलमान हा सुतारकाम करतो. सलमानच्या भावानेच आपल्या वहिनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचे नाव आरिफ असे आहे. 

दीर आरिफने केलेल्या तक्रारीनुसार, 25 एप्रिल रोजी सलमानचा विवाह झाला होता. मात्र, दोन महिन्यानंतर जे व्हायला नको होतं तेच झालं आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास 10 वाजता विवाहित महिलेनं तिच्या सासरच्यांना लस्सी पिण्यास दिली होती. लस्सीत गुंगीच्या गोळ्या असल्याने सर्वजण बेशुद्ध होते. सकाळी सर्वजण उठल्यानंतर घरात सूनबाई गायब झाल्याचे पाहून सासरच्यांना धक्काच बसला. 

हेही वाचा : 'इथं सिगारेट पिऊ नका' तरुणाने पर्यटकांना सांगितलं अन् आरोपींनी दगडाने ठेचत...पानशेत हादरलं

मध्यरात्री 1 वाजता तिनं प्रियकराशी संपर्क करत पळ काढला. यावेळी ती आपल्या प्रियकराच्या दुचाकीवर बसलेली होती. या कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. अखेर दीराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही पाहाणारा पहिला मीच होतो. वहिनीने जे केलंय, त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. अखेर कुटुंबाला तो व्हिडिओ दाखवला आणि कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. 


 

    follow whatsapp