भाऊजींच्या प्रायव्हेट पार्टला दांडकाने मारलं! बहिणीलाही सोडलं नाही..डबल मर्डरची घटना वाचून थरकापच उडेल

मुंबई तक

• 10:34 PM • 21 Jun 2025

Shocking Double Murder Case : हे प्रकरण 2007 चं आहे. जून महिना, 15 तारीख. संध्याकाळचे 5 वाजत होते. सूर्यास्तहोत होतं. पण गरमी अजूनही कायम होती.

Shocking Double Murder Case

Shocking Double Murder Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नराधमांनी भाऊजी आणि बहिणीची केली निर्घृण हत्या

point

पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या

point

हत्येमागंच नेमकं कारण काय?

Shocking Double Murder Case : हे प्रकरण 2007 चं आहे. जून महिना, 15 तारीख. संध्याकाळचे 5 वाजत होते. सूर्यास्तहोत होतं. पण गरमी अजूनही कायम होती. हरियाणा रोडवेजची एक बस कुरुक्षेत्रहून करनालकडे जात होती. त्याचदरम्यान सफेद कार बसमोर येऊन थांबली. कारमधून आठ-दहा माणसं उतरली आणि बसमध्ये चढले. ते लोक प्रचंड रागात होते. एकाने जोरात आवाज दिला, हा बघ मनोज, याला खाली उतरा. मनोजसोबत बसलेली मुलगी 19 वर्षांची होती आणि शरीराने सडपातळ होती.

हे वाचलं का?

दोघांनीही एकमेकांचा हात पकडला होता. कारमधून आलेल्या लोकांनी मनोजला आणि त्या महिलेला ओढून खाली उतरलं. बसमध्ये असलेले प्रवासी घाबरले होते. ड्रायव्हरने भीतीपोटी बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खाली एक व्यक्ती मनोजवळ पोहोचला. त्याने मनोजचे हातपाय बांधले आणि इतर लोकांनी मनोजला जबर मारहाण केली. हे प्रकरण आहे करनालचं डबल मर्डर केस. 

हे ही वाचा >> Video: महाबळेश्वर, साताऱ्यात तुफान पाऊस, वेण्णा लेक ओव्हरफ्लो.. ही दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी!

मनोजचे हायपाय दोरीने बांधले आणि..

कारमधून बसमध्ये चढलेल्या लोकांनी मनोजचे हातपाय बांधले आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला दांडकाने मारलं. मनोज जोरजोरात ओरडला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. त्या महिलेसमोरच मनोजची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्या मुलीच्या तोंडात नराधमांनी अॅसिड टाकलं. तिच्या तोंडातून आग येऊ लागली. त्यानंतर त्या महिलेचाही मृत्यू झाला. लव्ह मॅरेज केल्यामुळे नराधमांनी त्यांच्या भाऊजींचा आणि बहिणीचा खून केला. 26 जून 2007 रोजी करनालच्या बुटाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमरदासने कार मालक राजेशच्या घरी छापा टाकला आणि या घटनेबाबत महत्त्वाचे पुरावे गोळा केले.

सर्वांना झाली फाशीची शिक्षा

पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांकडून फोन नंबर आणि कॉल डिटेल्स घेतले. 1 जुलैला पोलिसांनी मुलीचा भाऊ सुरेश, काका राजेंद्र आणि मावस भाऊ गुरुदेवला अटक केलं. पुढच्या दिवशी मामा बारुराम आणि मावस भाऊ सतीशलाही अटक केली. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, 25 मार्च 2010 ला करनाल सेशन कोर्टाने सुरेश, राजेंद्र, बारूराम, सतीश, गुरुदेव, गंगाराज आणि ड्रायव्हर मनदीपला दोषी ठरवलं. गंगाराजला जन्मठेप,सुरेश, राजेंद्र, बारूराम आणि गुरुदेवला फाशीची शिक्षा ठोठावली.

हे ही वाचा >> दोन मुलांची आई चटावलेली अनैतिक संबंधाला, तरुण मुलाच्या नादात बसली नको ते करून...