Crime News: गुजरातच्या गोंडल येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील 60 वर्षीय दिनेश सोलंकी नावाच्या व्यक्तीसोबत भयानक घटना घडल्याची माहिती आहे. खरं तर, मागील महिन्यात, दिनेशचं त्याच्या पत्नीसोबत मोठं भांडण झालं आणि त्यानंतर, तो घर सोडून निघून गेला होता. मंगळवारी, वृद्ध व्यक्ती वडिया तालुक्यातील अर्जंसुख गावात आपली भाची मनीषाच्या घरी गेली होती. पीडित वृद्धाला घरातील सदस्यांसोबत मिळून कौटुंबिक वाद मिटवायचा होता. मात्र, त्यावेळी त्याच्या पत्नीचे पाच भाऊ अचानक संतापले आणि त्यांनी मिळून दाजीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पीडित वृद्धाचे पाय कुऱ्हाडीने कापून टाकण्यात आले.
ADVERTISEMENT
बोलणं सुरू असताना वाद वाढत गेला अन्...
35 वर्षांपूर्वी दिनेशचं रतन नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलं सुद्धा आहेत. महिन्याभरापूर्वीच त्याचा त्याच्या पत्नीसोबत मोठा वाद झाला आणि त्यानंतर, दिनेश त्याच्या पत्नीला सोडून घराबाहेर निघून गेला. पीडित वृद्धाची भाची मनीषाने पोलिसात दाखल केलेल्या FIR नुसार, कंजी सवालिया आणि हाकू सवालिया नावाचेय दिनेशचे मेहुणे तिच्या घरी भांडण मिटवण्यासाठी आले होते. मात्र, यादरम्यान मनीषाचा पती बाहेर गेल्यानंतर, बोलणं सुरू असताना वाद वाढला. त्यावेळी, हाकूने त्याच्या तीन अज्ञात साथीदारांना घरी बोलवलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: 'मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचं असेल तर मुंबईतील झोपडपट्ट्यांवर कठोर...', मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण
मेहुण्यांनी मिळून दाजीचे पायच कापून टाकले
त्यातील एका तरुणाजवळ धातूची पाइप तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती. त्यानंतर, त्यांचा समूह घरात घुसला. वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. मारहाणीच्या दरम्यान, दिनेशच्या डोक्यावर वार करण्यात आला आणि त्यामुळे पीडित वृद्ध खाली कोसळला. हल्लेखोरांपैकी दोघेजण घराबाहेर लक्ष ठेवत होते. तसेच, दिनेशला पकडून हल्लेखोरांनी त्याचे पाय कापून टाकले. हा हल्ला सुरू असताना मनीषा मदतीसाठी ओरडत होती, पण आरोपींनी तिला घराबाहेर ढकललं. घटनेनंतर, आरोपी तरुण घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीतून पळून गेले.
हे ही वाचा: Bihar Election Result 2025 Live Update: तेजस्वी यादवांनी गेम पलटला, घेतली आघाडी
उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यानंतर, दिनेशला अमरेली सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर त्याला राजकोट सिव्हिल रुग्णलयात रेफर करण्यात आलं. मात्र, गंभीर जखमा झाल्याने बुधवारी उपचारादरम्यान दिनेशचा मृत्यू झाला. संबंधित प्रकरणासंदर्भात, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात दिनेशचं त्याच्या पत्नीसोबत मोठं भांडण झाल्याने वाद मिटवण्यासाठी तो घर सोडून गावी चर्चा करण्यासाठी गेला होता. बोलणं सुरू असताना वाद वाढत गेला आणि मेहुण्यांनी मिळून आरोपीवर धारदार शस्त्रांसह वार केले. आता पोलिसांनी आरोपी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT











