लिव्ह-इन-पार्टनरसोबत मैत्री करून देण्यासाठी बॉसचा दबाव! दोघांनी मिळून हत्येचा रचला कट अन् अखेर...

एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. घटनेतील मृत व्यक्ती ही आरोपी तरुणाची बॉस असल्याचं सांगितलं जात आहे.

दोघांनी मिळून हत्येचा रचला कट अन् अखेर...

दोघांनी मिळून हत्येचा रचला कट अन् अखेर...

मुंबई तक

• 11:36 AM • 16 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

लिव्ह-इन-पार्टनरसोबत मैत्री करून देण्यासाठी बॉसचा दबाव!

point

दोघांनी मिळून हत्येचा रचला कट अन् अखेर...

Crime News: हरियाणातील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. घटनेतील मृत व्यक्ती ही आरोपी तरुणाची बॉस असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या, पोलिसांचं पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती ही आरोपी तरुणावर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत आपली मैत्री करून देण्यासाठी दबाव आणत होता. तो गेले बरेच दिवस, आपल्या बॉसच्या या कृत्यामुळे वैगातला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रागाच्या भरात त्या तरुणाची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तापासदरम्यान लिव्ह-इन पार्टनरला अटक केली असून चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

बॉसच्या हत्येचा रचला कट  

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येतील मुख्य संशयित आरोपी हा त्याच कंपनीत एक जूनिअर कर्मचारी म्हणून कार्यरत होता. रागाच्या भरात ज्युनियर कर्माचाऱ्याने त्याच्याच बॉसची हत्या करण्याचा कट रचला. खरं तर, बॉसला आरोपीच्या लिव्ह-इन पार्टनरशी मैत्री करण्याची इच्छा होती, असं पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा: लिंग बदलासाठी दबाव अन् शारीरिक छळ! कुत्र्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं... मुंबईतील तरुणासोबत काय घडलं?

प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव सोनपाल असल्याची माहिती समोर आली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी होता आणि कामाच्या निमित्ताने तो  गुरुग्राममधील खोह गावात भाड्याच्या घरात राहत होता. सोनपाल मानेसरमधील इंडस्ट्रियल मॉडेल टाउनशिप (IMT) मध्ये असलेल्या एका खाजगी कंपनीत काम करत होता.

हे ही वाचा: साताऱ्यात निवृत्त सैनिकाने केला शेतमजुराचा खून, मृतदेह घरामागे जाळला, 6 महिन्यांनंतर कसं समोर आलं सत्य?

आरोपींना अटक करण्यात आली 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यात आली असून मुख्य संशयिताची ओळख कुशलपाल सिंग उर्फ ​​कौशल (26) अशी असल्याची माहिती आहे. कौशल उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैमथल गावचा रहिवासी आहे आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर भावना (19) ही कासगंजमधील प्रल्हादपूर गावची रहिवासी आहे. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, दोन्ही आरोपी आयएमटी मानेसरच्या सेक्टर 1 मधील एका घरात एकत्र राहत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.

    follow whatsapp