पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय! दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीची निर्घृण हत्या... नंतर, मृतदेह नाल्यात फेकला

एका तरुणाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आणि यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पत्नीच्या हत्येनंतर, आरोपीने मृतदेह घराबाहेर एका नाल्यात फेकला.

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या!

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या!

मुंबई तक

• 04:18 PM • 15 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय!

point

दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीची निर्घृण हत्या...

point

हत्येनंतर, पत्नीचा मृतदेह नाल्यात फेकला

Crime News: दिल्लीच्या शालीमार बाग परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आणि यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पत्नीच्या हत्येनंतर, आरोपीने मृतदेह घराबाहेर एका नाल्यात फेकला. शुक्रवारी सकाळी नाल्याजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित महिलेचा मृतदेह पाहिला आणि त्यांनी याबाबत लगेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, ही घटना उघडकीस आली. 

हे वाचलं का?

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांतच मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं. आरोपी पतीचं नाव विष्णू असून तो आरयू नगरमध्ये पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांसोबत राहत होता. चौकशीदरम्यान, आरोपी पतीने त्याचा गुन्हा कबूल करत सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय होता. याच संशयामुळे रागाच्या भरात स्वयंपाकघरातील तव्याने पीडितेवर वार केला आणि नंतर, दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडिता गंभीररित्या जखमी झाली आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. 

पत्नीला बेदम मारहाण अन् मृत्यू...

पोलिसांनी आरोपी आणि मृत महिलेच्या मुलांची सुद्धा चौकशी केली. चौकशीदरम्यान, वडिलांनी आईला रात्री बेदम मारहाण केल्याचं मुलांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, वडिलांनी आधी तव्याने आईच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार केला. नंतर, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये पीडिता गंभीररित्या जखमी झाली. हल्ल्यानंतर, आरोपी पत्नीला तिथे त्याच अवस्थेत सोडून निघून गेला आणि पुन्हा एका तासानंतर पुन्हा परत आला. मात्र, तेव्हा पीडिता रक्तबंबाळ अवस्थेत फरशीवर पडलेली आढळली आणि तिचा मृत्यू झाला होता. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: सेंट्रल मुंबईतील पहिला ट्विन केबल ब्रिज! वाहतूक केंद्रच नव्हे तर पर्यटन स्थळ सुद्धा...

हत्येनंतर, मृतदेह नाल्यात फेकला 

मारहाणीतून पत्नीच्या मृत्यू झाल्यामुळे आरोपी घाबरला. त्यानंतर, कसलाही विचार न करता पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तो घराबाहेर पडला आणि जवळच्या नाल्यात तिचा मृतदेह फेकून दिला. हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी आरोपी पतीने पत्नीचा मृतदेह नाल्यात फेकला. सकाळी जवळपास 9 वाजताच्या सुमारास स्थानिकांना जवळच्या नाल्यात पीडितेचा मृतदेह पाहिला आणि त्यांनी याबाबत लगेच पोलिसांना माहिती दिली. 

हे ही वाचा: शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला सांगितल्या, वसईतील 6 वीत शिकणाऱ्या अंशिकाचा बालदिनीच मृत्यू

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळावर पोहोचले. त्यावेळी, विष्णू नाल्यातून पत्नीचा मृतदेह बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना दिसला. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तपासात दिसून आलं की विष्णूला दारूचं व्यसन होतं आणि नशेत तो बऱ्याचदा हिंसक होत असल्याचं तपासादरम्यान समोर आलं. शेजारी आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितलं की विष्णून नुकतंच त्याच्या वडिलांचा डोळा फोडला होता. त्याच्या घरात नेहमी वाद आणि मारहाणीच्या घटना घडत असायच्या. 

सध्या, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनेच्या दिवशी घरात नेमकं काय घडलं? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

    follow whatsapp