विवाहित पुरुषांसोबत रात्र... रोमान्स करून पैसे कमवते! क्लायंट्सच्या पत्नींबद्दल केलं वादग्रस्त विधान

लिलिथ ही विवाहित पुरुषांसोबत रात्र घालवते आणि त्यांच्यासोबत रोमान्स करून बक्कळ पैसा कमवते. मात्र, नुकतंच तिने सोशल मीडियावर केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

क्लायंट्सच्या पत्नींबद्दल केलं वादग्रस्त विधान

क्लायंट्सच्या पत्नींबद्दल केलं वादग्रस्त विधान

मुंबई तक

• 04:59 PM • 15 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित पुरुषांसोबत रोमान्स करून पैसे कमवते!

point

सोशल मीडियावर क्लायंट्सच्या पत्नींबद्दल केलं वादग्रस्त विधान

Crime News: जगभरातील बऱ्याच महिला पैसे कमवण्यासाठी विचित्र पर्याय अवलंबतात. अशाच एका महिलेबद्दल जाणून घ्या. संबंधित महिला ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील रहिवासी असून तिचं नाव लिलिथ लॉज (Lillith Lodge) असल्याची माहिती आहे. लिलिथ ही विवाहित पुरुषांसोबत रात्र घालवते आणि त्यांच्यासोबत रोमान्स करत असल्याचं सांगितलं जात आहे. याच माध्यमातून ती बक्कळ पैसा कमवते. मात्र, नुकतंच तिने सोशल मीडियावर केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे. 

हे वाचलं का?

"मी फक्त सर्व्हिस देत आहे..." लिलिथचं विधान 

लिलिथ स्पष्टपणे म्हणाली की, जर तिच्या क्लायंटच्या म्हणजेच त्या पुरुषांच्या पत्नींना तिच्या व्यवसायाबद्दल कळालं तर काय होईल याची तिला कोणतीही चिंता किंवा भीती नाही. लिलिथच्या म्हणण्यानुसार, ती काहीही चुकीचे करत नाहीये, तर फक्त 'सर्व्हिस' देत आहे आणि खरी चूक तिची सर्व्हिस घेणाऱ्या विवाहित पुरुषांची आहे. लिलिथने सोशल मीडियावरील एका प्रश्नाला उत्तर देताना हे खळबळजनक विधान केलं. ़

हे ही वाचा: पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय! दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीची निर्घृण हत्या... नंतर, मृतदेह नाल्यात फेकला

लिलिथला फॉलोअरने नेमका काय प्रश्न विचारला? 

सोशल मीडियावर एका फॉलोअरने लिलिथला विचारलं की तिच्या क्लायंटच्या पत्नी तिच्याशी संपर्क साधतील, याची तिला भिती वाटत नाही का? लिलिथने यावर उत्तर दिलं, "मी हे काम साडेतीन वर्षांपासून करत आहे आणि आतापर्यंत कोणत्याही क्लायंटच्या पत्नीने माझ्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही." ती पुढे म्हणाली, "हे एके दिवशी घडूही शकतं, पण याची मला भीती वाटत नाही. ते माझे काय करू शकतात? ते मला अपमानास्पद मॅलेजच पाठवतील ना? मला दररोज असे मॅसेजेस मिळतात." लिलिथ पुढे म्हणाली, "या महिलांचा राग चुकीचा आहे. ज्यावर त्यांना राग यायला हवा ते त्यांचे पती आहेत, मी नाही. मी त्यांना कोणतंही वचन दिले नाही आणि मी त्यांच्याशी विवाहित नाही. मी फक्त एक सर्व्हिस देते आणि पैशांसाठी पुरुषांच्या गरजा पूर्ण करते."

हे ही वाचा: अमरावती : घराच्या दुरुस्तीसाठी आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली, विवाहितेने नवऱ्याला फिल्मी प्लॅन आखून संपवलं

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

ती स्पष्टपणे म्हणाली की खरे दोषी ते पती होते जे तिच्या वेबसाइटला भेट देतात, तिच्याशी संपर्क साधतात, पैसे देतात आणि तिच्याकडून सर्व्हिस घेतात. या वादग्रस्त विधानानंतर, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. या मुद्द्यावर नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिलिथच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली. एका यूरजरने लिहिलं, "100 टक्के खरं!", तर दुसऱ्याने म्हटलं, "हो, अगदी बरोबर." तसेच, अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका केली. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, "हे नैतिकदृष्ट्या चूकीचं आहे. मी विवाहित पुरुषासोबत असे करू शकत नाही." तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं, "स्त्रियांना अजूनही हे करावे लागतं हे लाजिरवाणे आहे."

    follow whatsapp