Crime News: शुक्रवारी (14 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत एक तरुण आढळला. संबंधित तरुणाला त्या अवस्थेत पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. जेव्हा आसपासच्या लोकांनी त्या तरुणाकडे जाऊन त्याच्या अशा अवस्थेबद्दल विचारलं असता तो एकच गोष्ट सतत सांगत होता. तो म्हणाला की, "माझ्या पत्नीला बोलवा, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत." तिथल्या लोकांनी तरुणाचं बोलणं ऐकलं आणि त्याची गंभीर अवस्था पाहून स्थानिक रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
ADVERTISEMENT
तरुण गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळला
संबंधित प्रकरण हे झाशीच्या मोंठ रेल्वे स्टेशन येथील असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच, रेल्वे अधिकारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर पोलिसांना एक तरुण गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळला. अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाची चौकशी करण्यास सुरूवात केली. जखमी तरुणाने आपलं नाव विष्णू उर्फ मजनू असल्याचं सांगितलं आणि तो औरेया येथील रहिवासी असल्याचं देखील त्याने सांगितलं.
हे ही वाचा: "त्या काकांनी मला चॉकलेट दिलं आणि माझ्यासोबत..." 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत 67 वर्षीय वृद्धाचं घृणास्पद कृत्य!
"माझ्या पत्नीला तो घेऊन गेला..."
त्यावेळी, तो नेहमी आपल्या पत्नीचं नाव घेऊन बडबडत होता. तसेच, तो म्हणत होता की एक तरुण त्याच्या पत्नीला आपल्यासोबत घेऊन गेला आहे आणि त्याच तरुणासोबत मारहाण सुरू असताना त्या तरुणाने विष्णूच्या गळ्यावर चाकूने वार केला असल्याचं जखमी तरुणाने पोलिसांना सांगितलं.
हे ही वाचा: एकाच कंपनीत दोघांमध्ये प्रेमसंबंध... पण 'त्या' कारणामुळे विवाहित महिलेची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे केले अन्...
पोलिसांनी दिली माहिती
रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दारूच्या नशेत होता आणि त्याला यापूर्वी सुद्धा आरपीएफने स्टेशनच्या बाहेर काढलं होतं. मात्र, तरीसुद्धा तो पुन्हा स्टेशनवर आला. त्यावेळी, तो तरुण जखमी अवस्थेत असल्याचं रेल्वे पोलिसांनी पाहिलं. त्याच्या मानेवरून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. विष्णूने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, तो औरेया येथे राहत असून त्याची पत्नी भोपालची रहिवासी आहे. आता, पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला असून जखमी तरुणावर झांसीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT











