'ती नवऱ्याची आतडी पिशवीत भरत होती...' शेजाऱ्यानं बघितलं भयानक दृश्य; काय घडलं?

मुंबई तक

• 07:11 AM • 31 Aug 2026

एका बायकोने आपल्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. शेजारी तिथे पोहोचला तेव्हा त्याने आरोपी बायको आपल्या नवऱ्याची आतडी एका पिशवीत भरताना त्यांनं पाहिलं. ही भयंकर घटना हरियाणात घडली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ती नवऱ्याची आतडी पिशवीत भरत होती...

point

शेजाऱ्यानं बघितलं भयानक दृश्य

point

काय घडलं?

Crime News : एका महिलेने आपल्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 40 वर्षीय राजेश यांचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. आरोपी पत्नी विमला देवी हिने पतीच्या छातीपासून ते ओटीपोटापर्यंत तब्बल 35 सेंटीमीटर लांब वार करुन पोट चिरले. यानंतर पोटातून बाहेर आलेल्या आतड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरण्याचा प्रयत्न तिने केला. शवविच्छेदन अहवालात राजेश यांच्या शरीरातील यकृताचा मोठा भाग आणि उजवे मूत्रपिंड गायब असल्याचे स्पष्ट झाल्याने या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र परिसरातील ही घटना आहे. 

हे वाचलं का?

आतडी पिशवीत भरताना दिसली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमला देवीने या हत्येसाठी एका मोठ्या चाकूचा वापर केला. याशिवाय इतर दोन लहान चाकूंचा वापर करून तिने मृतदेहावर दोन्ही बाजूंना गंभीर जखमा केल्या. शनिवारी (22 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या दाम्पत्यामध्ये तीव्र वाद झाला होता. घरमालक रिंकू हे भांडणाचा आवाज ऐकून वरच्या मजल्यावर पोहोचले असता, त्यांना राजेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले आणि विमला ही पतीची बाहेर आलेली आतडी पिशवीत भरताना आढळून आली. घरमालकाला पाहताच घाबरलेल्या विमलाने थेट गच्चीवरून खाली उडी मारली.

हे ही वाचा : NEET विद्यार्थिनीने संपवलं जीवन, लहान बहिणीने दरवाजा उघडताच बसला धक्का

गच्चीवरुन मारली उडी

गच्चीवरून खाली पडल्यामुळे विमलाच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून मणक्याच्या दुखापतीचे गांभीर्य तपासण्यासाठी एमआरआय (MRI) स्कॅन केला जाणार आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी वेगवेगळ्या आकाराचे तीन चाकू हस्तगत केले आहेत. मृत राजेश हे मूळचे उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचे रहिवासी होते आणि ते कुरुक्षेत्रात एका कंपनीत वॉटर सप्लाय कर्मचारी म्हणून काम करत होते. ते विमलासोबत गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी राहत होते.

हे ही वाचा : भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू, पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?

अघोरी पूजेचा संशय

या हत्येमागे अंधश्रद्धा किंवा अघोरी पूजेचा (तांत्रिक प्रथा) प्रकार असण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत. मात्र, हत्येचे मुख्य कारण अजून स्पष्ट झालेले नाही. कुरुक्षेत्र पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विमला देवीची कसून चौकशी केली जाईल आणि त्यानंतरच हत्येमागील खरा हेतू तसेच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.