हिंगोली : माण तालुक्यातील हिंगणी गावात बुधवारी (दि.9) सकाळी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या डोक्यात घण मारून हत्या केली आणि नंतर स्वतःही गळफास घेऊन जीव दिला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी गावाच्या हद्दीतील आसाळओढा परिसरातील घुटुकडे वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी सहाच्या सुमारास अनिता बंडू घुटुकडे (वय 31) ही महिला तिच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली, तर शेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये तिचा पती बंडू अंकुश घुटुकडे (४०) यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पत्नीचे अनैतिक संबंध आणि तब्बल 5 वेळा घडला 'तो' प्रकार, पतीने मागचा-पुढचा विचार न करता थेट...
लोखंडी घण डोक्यात घालून केली पत्नीची हत्या
प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले की, बंडू यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत लोखंडी घणाने तिच्या डोक्यात वार करून खून केला आणि नंतर विष प्राशन करून गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी ज्ञानेश्वर वस्ताद झिमल (31) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : Viral: तिने बिकिनी घातली अन् 'तो' व्हिडिओ केला शेअर, सोशल मीडियावर राडा सुरू झाला ना भाऊ!
पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या, दोन्ही मुलं झाली पोरकी
अनिता आणि बंडू घुटुकडे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दाम्पत्याला दोन मुले असून, मुलगी चौथीत आणि मुलगा सहावीत शिक्षण घेत आहे. पालकांचे छत्र हरवल्याने ही दोन्ही मुले आता अनाथ झाली आहेत. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आईकडील की वडिलांकडील नातेवाईक घेणार, याचा निर्णय पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर होणार आहे. ही घटना कौटुंबिक वादातून उभ्या राहिलेल्या संशयाच्या विनाशकारी परिणामांची जाणीव करून देते. संशय आणि रागाच्या भरात दोन जीवांचे नुकसान होऊन दोन निरपराध बालकांचे आयुष्य अंधारमय झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी, कोण जिंकणार खटला?
ADVERTISEMENT
