मुलीने ITBP जवानासोबत प्रेमविवाह केला, बापाने सूड उगवला, काय घडलं?

मुंबई तक

04 Aug 2026 (अपडेटेड: 04 Aug 2026, 11:08 AM)

honour killing : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी 24 वर्षीय मुलीची मारहाण करून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

honour killing

honour killing

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलीने ITBP जवानासोबत प्रेमविवाह केला

point

बापाने सूड उगवला, काय घडलं?

honour killing : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध विवाह केल्याच्या रागातून एका वडिलांनी स्वतःच्या 24 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विमल शर्मा याला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत तरुणीचे नाव अंकिता असून तिने सुमारे चार महिन्यांपूर्वी आयटीबीपीमध्ये कार्यरत असलेल्या अमित पचौरी याच्यासोबत न्यायालयात विवाह केला होता. मात्र या विवाहाला तिच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'राजकीय करिअर तुझं...' मुंडेंवर घणाघात; जरांगेंनी आंदोलनाचा प्लॅनही सांगितला

 स्कार्फच्या साहाय्याने गळा आवळून पोटच्या मुलीचा खून 

पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहानंतर अमित पचौरी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी परतला होता, तर अंकिता आपल्या आई-वडिलांच्या घरीच राहत होती. या विवाहामुळे घरात सातत्याने तणावाचे वातावरण होते. सोमवारी रात्री या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. आरोपी विमल शर्मा याने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर स्कार्फच्या साहाय्याने तिचा गळा आवळला. या संपूर्ण घटनेच्या वेळी त्याची पत्नी आणि मुलगा घरात उपस्थित होते. हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नी आणि मुलाला घराबाहेर जाण्यास सांगितले आणि स्वतः मृतदेहाजवळ बसून राहिला.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, तरीही 'या' जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

प्रेम विवाहामुळे संतप्त झालेला बापाने लेकीला क्रूरपणे संपवलं 

दरम्यान, घरातून येणाऱ्या आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी अनेकदा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी घरातील दिवेही बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी अंकिता बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती आणि तिच्या गळ्याभोवती स्कार्फ घट्ट आवळलेला होता. तिच्या तोंडातून रक्त येत असल्याचेही पोलिसांनी पाहिले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरोपी विमल शर्मा याने मुलीच्या न्यायालयीन विवाहामुळे आपण संतप्त झालो होतो, असे पोलिसांना सांगितले. मुलीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने संबंध तोडण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.