ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 30 Jun 2025, 01:28 PM)

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे भाग्यश्री हॉटेल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा राडा, तरूणाला चोपलं

point

हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?

तुळजापूर : “नाद करती काय, यावचं लागतंय” या टॅगलाइनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या तुळजापूरजवळील भाग्यश्री हॉटेलवर पुन्हा एकदा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी हॉटेलमधील कामगार आणि काही तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हॉटेल भाग्यश्रीवरील राड्याची ही तिसरी-चौथी वेळ आहे. 

हे वाचलं का?

कामगार आणि तरूणामध्ये मारहाण

व्हायरल व्हिडिओमध्ये हॉटेलमधील कामगार आणि तरुण एकमेकांना शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. काही कारणांवरुन कामगार आणि तरूणाचा वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हॉटेल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

हे ही वाचा >> अखेर ठरलं! 5 जुलैला दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं...

या प्रकरणावर हॉटेलचे व्यवस्थापक नागेश मडके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हॉटेलची बदनामी करण्याच्या उद्देशानेच अशा घटना घडवल्या जात आहेत. काही जण मुद्दामहून व्हिडिओ व्हायरल करून हॉटेलची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

हे ही वाचा >> पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दिल्या गुंगीच्या गोळ्या, निर्जनस्थळी नेलं अन् सपासप वार करत संपवलं, कारण ऐकून हादरून जाल

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे भाग्यश्री हॉटेल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.