चोरांना पकडण्यासाठी घरमालकाने चक्क मांत्रिकालाच बोलावलं! लिंबू, मिरची अन् नारळ ठेऊन खेळ सुरु केला अन् घडलं भयंकर..

Nanded Shocking Viral News :  नांदेडमध्ये एक धक्कादायक घडल्याने खळबळ माजली आहे. येथील एका घरात चोरीची घटना घडली. पण घरमालकाने पोलिसांना बोलवण्याऐवजी चक्क मांत्रिकालाच बोलावलं

काळ्या जादूचा फाइल फोटो

Shocking Viral News

मुंबई तक

15 Aug 2025 (अपडेटेड: 15 Aug 2025, 07:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चोरी झाली अन् मांत्रिकाला बोलावलं..

point

मंदिराच्या समोर अंधश्रद्धेचा खेळ

point

पोलिसांना खबर मिळाली अन् नंतर..

Nanded Shocking Viral News :  नांदेडमध्ये एक धक्कादायक घडल्याने खळबळ माजली आहे. येथील एका घरात चोरीची घटना घडली. पण घरमालकाने पोलिसांना बोलवण्याऐवजी चक्क मांत्रिकालाच बोलावलं. त्यानंतर मांत्रिकाने जे केलं, ते पाहून गावातील लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात जादू-टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

चोरी झाली अन् मांत्रिकाला बोलावलं..

जुलै रोजी रामा अरोटे नावाच्या व्यक्तीच्या घरी चोरीची घटना घडली होती. पण त्यांनी पोलिसांना तक्रार दाखल करण्याऐवजी भलतंच केलं. 11 ऑगस्टला धर्माबाद तालुक्याच्या जरीकोट गावात राहणारा मांत्रिक गंगाराम कादरीला बोलावलं.

हे ही वाचा >> मोठी बातमी: संजय राऊतांकडून थेट सेना-मनसे युतीची घोषणा, फक्त मुंबईतच नाही, 'इथेही' होणार युती!

मंदिराच्या समोर अंधश्रद्धेचा खेळ

गावात पोहोचल्यानंतर मांत्रिकाने चोरीच्या संशयाप्रकरणी  6 लोकांना अटक केली आहे. यामध्ये परमेश्वर राठोड आणि 5 अन्य लोकांचा समावेश होता. या सर्वांना गावातील हनुमान मंदिरासमोर आणण्यात आलं. त्यानंतर मांत्रिकने मंदिरासमोर लिंबू, मिरची आणि नारळ ठेवून मांत्रिक खेळ सुरु केला. मांत्रिकाने सर्व संशयितांना एका पाण्याच्या टाकीत बुडवलं. त्यानंतर त्यांना भात आणि पानात ठेवलेल्या गोष्टी खायला दिल्या. गावातील लोक हे सर्व पाहून थक्कच झाले. 

पोलिसांना खबर मिळाली अन् नंतर..

जेव्हा हा धक्कादायक प्रकार सुरु होता. तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. वानाले नावाच्या व्यक्तीनं हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद केला अन् याचा व्हिडीओ पोलिसांना पाठवला. व्हिडीओ समोर येताच 4 लोकांवर जादू-टोण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा >> Independence Day : इंग्रजांनी 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताकडे सत्ता का सोपवली? शेवटच्या 24 तासात काय काय घडलं?

पोलिसांनी काय म्हटलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना झाली होती. पण तक्रार दाखल करण्याऐवजी मांत्रिकाला बोलावून 5-6 लोकांवर संशय व्यक्त केला. त्यांच्यासोबत चुकीचं वर्तन केलं. आरोपींनी लोकांना कपड्यांसह थंड पाण्यात बुडवलं. याप्रकरणी चार लोकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

 

    follow whatsapp