Murder Case: तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील गोबीचेट्टीपलयम येथे एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी पत्नीने आपल्या प्रियकरासोबत योजना आखून पतीची निर्घृण हत्या केली आणि नंतर त्याच्या मृतदेहाची विचित्र पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
गोबीचेट्टीपलयम येथील इलुर परिसरात नेहमीप्रमाणे शेतातून जात असताना काही गावकऱ्यांना जमिनीच्या आतून एक मानवी पाय बाहेर पडताना दिसला. सुरुवातीला कोणालाच यावर विश्वास बसला नाही, परंतु जवळून पाहिल्यावर तो एका मृतदेहाचा भाग असल्याचं स्पष्ट झालं. या घटनेमुळे घाबरलेल्या गावकऱ्यांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली.
प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला मृतदेह
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं. काही वेळातच मातीखाली प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला एक कुजलेला मृतदेह आढळला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आणि त्यांनी प्राथमिक पोस्टमॉर्टम तपासणी केली. एखादी जड वस्तू डोक्यावर मारल्याने मृत तरुणाचा मृत्यू झाल्याचं रिपोर्ट्समध्ये दिसून आलं . यावरून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
पत्नीवर आला संशय
हा मृतदेह इलूर येथील रहिवासी चिन्नाराजचा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी लगेच त्याच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली. चौकशी केली असता, त्याची पत्नी अम्मासी हिने सांगितलं की तिचा पती बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता होता आणि ती तिच्या कुटुंबियांसोबत त्याचा शोध घेत होते. पण तिच्या बोलण्यावर आणि वागण्यावर पोलिसांना संशय आला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आणखी सोप्पं! ‘या’ नव्या प्लॅनविषयी माहितीये?
पतीला संपवण्याची योजना
अखेर कठोर चौकशीनंतर अम्मासीचा खोटेपणा हळूहळू उलगडकीस येऊ लागला. नंतर, अम्मासीचे गेल्या दोन वर्षांपासून तिचा नातेवाईक मधेशसोबत अनैतिक संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले. चिन्नाराजच्या पतीला हे कळताच त्यावेळी त्याने आपल्या पत्नीला नातेसंबंध संपवण्याची ताकीद दिली. पण, अम्मासी आणि मधेशने चिन्नाराजला संपवण्याची एक भयानक योजना आखली.
लोखंडी रॉडने वार केले आणि जागीच मृत्यू
पोलिसांच्या माहितीनुसार, मधेशने चिन्नाराजच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, सगळे पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळला आणि शेतातील एका खड्ड्यात पुरला.
हे ही वाचा: Govt Job: भारतीय सैन्यात भरती व्हायचंय? मग ‘ही’ संधी अजिबात सोडू नका, काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
पोलिसांच्या सखोल चौकशीत, अम्मासीने आपला गुन्हा कबूल केला. या आधारे पोलिसांनी तिला आणि तिचा प्रियकर मधेशला अटक केली. न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
