मुंबईची खबर: आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आणखी सोप्पं! ‘या’ नव्या प्लॅनविषयी माहितीये?

मुंबई तक

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी जलद गतीने मुंबईला पोहोचवण्यासाठी एक नवीन योजना तयार करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आणखी सोप्पं!
आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आणखी सोप्पं!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आणखी सोप्पं!

point

‘या’ नवीन प्लॅनविषयी सविस्तर जाणून घ्या

Mumbai News: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी जलद गतीने मुंबईला पोहोचवण्यासाठी एक नवीन योजना तयार करण्यात आली आहे. या नवीन योजनेअंतर्गत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाण्यातील साकेत आणि आमणे दरम्यान एक नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 29.3 किमी लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामासाठी एमएमआरडीए 6,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशातील सर्वात हाय-टेक महामार्गाला मुंबईशी जोडणाऱ्या रस्त्याचे ईपीसी बांधकाम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने टेंडर मागवले आहेत. 29.3 किमी लांबीचा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 3, मुंबई-नाशिक महामार्गावर बांधला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आमणे ते साकेत दरम्यानच्या रस्त्याच्या बांधकामामुळे, वाहतूक कोंडीत न अडकता समृद्धी महामार्गावरून प्रवासी थेट ठाण्यात पोहोचू शकतील. ठाण्यातील आनंद नगरपर्यंत ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्याचे काम सुरू झाले आहे. 29.3 किमी लांबीच्या एलिव्हेटेड रोडवरून उतरून वाहनचालकांना ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेने दक्षिण मुंबईला सहज पोहोचता येईल.

दोन पर्याय  

या रस्ता बांधला जाणार असल्यामुळे मुंबईहून नाशिक आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीपासूनही सुटका मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी दुसरा मार्ग उपलब्ध होईल. सध्या, प्रवासी नाशिकहून जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून ठाणे आणि मुंबईला जातात.

समृद्धी महामार्गामुळे कमी अंतर... 

समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, नाशिक आणि ठाणे अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून जातो आणि शेवटी मुंबईला पोहोचतो. राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणे, विविध प्रदेशांमधील संपर्क वाढवणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे आहे, हेच हा मार्ग तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. एक्सप्रेसवेवर सीसीटीव्ही आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी दर 5 किलोमीटर अंतरावर मोफत टेलिफोन बूथ आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp