दुबईहून पती घरी परतला, पत्नीसोबत खोलीचा आतला दरवाजा बंद केला अन्... सकाळी वडील घरी आले अन् ‘त्या’ अवस्थेत...

घरात पोहोचल्यानंतर काहीच आवाज ऐकू येत नसल्यामुळे संबंधित व्यक्ती तिच्या मुलगी आणि जावई राहत असलेल्या खोलीत गेली आणि त्यानंतर ते जे दृश्य दिसलं, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. नेमकं काय घडलं?

सकाळी वडील घरी आले अन् ‘त्या’ अवस्थेत...

सकाळी वडील घरी आले अन् ‘त्या’ अवस्थेत...

मुंबई तक

• 04:27 PM • 30 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीने पत्नीसोबत खोलीचा आतला दरवाजा बंद केला अन्...

point

सकाळी वडील घरी आले अन् ‘त्या’ अवस्थेत...

Crime News: बंगळुरू येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका  रात्री एक व्यक्ती घरी परतल्यानंतर त्यांना दार आतून बंद असल्याचं आढळलं. त्यावेळी चिंतेत येऊन त्यांनी त्यांच्या घरमालकाकडून एक एक्स्ट्रा चावी घेतली. चावी घेतल्यानंतर त्यांनी गेट उघडलं आणि त्यावेळी आत कोणीही नव्हतं. घरात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला खूप हाका मारल्या. त्यावेळी त्यांनी आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीच आवाज ऐकू येत नसल्यामुळे संबंधित व्यक्ती तिच्या मुलगी आणि जावई राहत असलेल्या खोलीत गेली आणि त्यानंतर ते जे दृश्य दिसलं, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

हे वाचलं का?

खरंतर, बंगळुरूचे रहिवासी असलेले पेरियास्वामी रविवारी रात्री 9:30 च्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत तुमकुरूहून बंगळुरूला परतले. त्यांचं घर सरकारी प्रेस लेआउटमध्ये होतं. त्यावेळी घरात आल्यानंतर त्यांना दरवाजा आतून बंद दिसला. बऱ्याचदा हाक मारल्यानंतर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांना चिंता वाटू लागली आणि चिंतेत येऊन पेरियास्वामीने घरमालकाकडून खोलीची एक्स्ट्रा चावी घेतली. त्यांनी दार उघडल्यानंतर आपली मुलगी मंजूला हाक मारली पण, त्यावेळी त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

खोलीत मुलगी आणि जावयाचे मृतदेह  

काहीच आवाज ऐकू येत नसल्यामुळे पेरियास्वामी त्यांची मुलगी आणि जावई राहत असलेल्या खोलीत गेले. त्यावेळी खोलीत त्यांची 27 वर्षांची मुलगी मंजू हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. खोलीतच त्यांना मंजूचा 29 वर्षीय पती धर्मासीलन पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. हे ऐकून पेरियास्वामींना मोठा धक्का बसला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन करून धर्मासीलनने मंजूची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा आरोप केला. यासंबंधी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

हे ही वाचा: ऑनलाइन गेमिंगचा नाद लय बेकार! पाच लाख रुपये गमावून बसला, नंतर कर्ज फेडण्यासाठी रचला ‘तो’ खोटा बनाव...

पती दुबईमध्ये काम करायचा  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजू तिच्या कुटुंबियांसोबत बंगळुरूमध्ये राहत होती. सप्टेंबर 2022 मध्ये तिचं लग्न तामिळनाडूमधील पिन्नलवाडी गावाचा रहिवासी असलेल्या धर्मासीलन नावाच्या तरुणासोबत झालं होतं. धर्मासीलन दुबईमध्ये काम करत होता आणि सुमारे एक महिन्यापूर्वी तो भारतात परतला होता. तो काही काळ मंजूसोबत तामिळनाडूमध्ये राहत होता. त्यानंतर मंजू कामासाठी बेंगळुरूला परतली. तीन दिवसांपूर्वी धर्मासीलनने पेरियास्वामीला तो सुद्धा बेंगळुरूमध्ये राहून काम करत असल्याचं सांगितलं होतं.

हे ही वाचा: आई गरबा बघायला गेली, घरात बापानेच लेकीवर केला अत्याचार, तीव्र वेदना होऊ लागल्याने... अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा

घटनेचा तपास सुरू... 

पेरियास्वामी यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना मंजू आणि धर्मासीलन यांच्यातील कोणत्याही वादाची माहिती नव्हती. तरीही, या भयानक घटनेमुळे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या खून-आत्महत्या प्रकरणामागील नेमकं कारण शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलं.

    follow whatsapp