आधी स्वत: लंडनला पळाला, आता कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कुटुंबातील सदस्यही फरार; मोठी अपडेट समोर

Gangster Nilesh ghaywal : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ काही दिवसांपूर्वी लंडनला पळाला होता. आता त्याच्या कुुटुंबातील सदस्यही फरार झाले आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Oct 2025 (अपडेटेड: 01 Oct 2025, 04:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

निलेश घायवळच्या कुटुंबातील सदस्यही फरार

point

निलेश घायवळ लंडनला पळाल्यानंतर पोलिसांकडून हालचाली सुुरु

Pune Crime News : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट पासपोर्ट बनवून लंडनला पळाल्याची माहिती समोर आला होती. दरम्यान, आता त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील फरार झाले आहेत. निलेश घायवळचा भाऊ दोन मुलं आणि बायको घरात नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निलेश घायवळच्या पुण्यातील आणि नगर जिल्ह्यातील घरातून नातेवाईक गायब झाले आहेत. निलेश घायवळ मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांकडून दोन्ही ठिकाणी नातेवाईकांचा शोध सुरू आहे. निलेश घायवळ परदेशी गेला असून त्याच्या बनावट पासपोर्टचा तपास पोलीस करत आहेत. बनावट पत्ता देऊन फसवणूक केल्याप्रकरणी निलेश घायवळवर पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. या अगोदर गाडीवर बनावट नंबर वापरला आणि मोका अंतर्गत निलेश घायवळ कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हे वाचलं का?

हेही वाचा : जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, रोहित पाटलांनी चांगलंच सुनावलं

पुण्यातील गुंड निलेश  घायवळ याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने अहिल्यानगर पोलिसांकडून निगेटिव्ह अ‍ॅड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळाल्यानंतरही बेकायदेशीरपणे पासपोर्ट मिळवला आणि लंडनला पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. कोथरुड परिसरात त्याच्या टोळीने केलेल्या हल्ल्यांच्या तपासादरम्यान तो परदेशात गेल्याचे समजल्याने पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

हेही वाचा : ही भिवंडी आहे, मराठीची गरज काय? अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला घायवळ असूनही त्याला पासपोर्ट कसा मिळाला आणि त्यामागे कोण होते, यावरून सध्या तीव्र चर्चा सुरू आहे. यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राजकीय नेत्यांचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुण्यातील शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निलेश घायवळ प्रकरणावर पाटील गप्प का आहेत, ते काही बोलत का नाहीत? असा सवाल धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणातून महायुतीत मतभेद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रवींद्र धंगेकर बुधवारी माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले, "निलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील का मौन बाळगून आहेत? त्यांची भूमिका काय आहे? घायवळला राजकीय वरदहस्ताशिवाय पासपोर्ट मिळणं अशक्य आहे. पोलिसांनी सखोल तपास करावा. त्याला नेमकी कोणाची मदत मिळते आहे, हे लोकांसमोर आले पाहिजे. मी आता सत्तेत आहे, पण खोटं असेल खोटं आणि बरोबर असेल तर बरोबरच म्हणतो. पुणेकरांच्या समस्या मांडणं हे माझं कर्तव्य आहे, असंही धंगेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 'शपथ घेतो की महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जावू देणार नाही ...' ठाकरेंच्या शिवसेनेचा काटा आणणारा दसरा मेळावा टीझर

    follow whatsapp