पाटणा (बिहार): प्रेमाच्या नादात आपल्याच व्यक्तीची हत्या करण्याच्या घटना सध्या देशभर चर्चेत आहेत. राजा रघुवंशीच्या हत्येचे प्रकरण अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही. हत्येचा आरोप असलेली पत्नी सोनम रघुवंशीबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान, बिहारमधील पटना येथून एका महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या प्रियकराची हत्या करण्यासाठी महिलेने पहिल्या प्रियकराची मदत घेतली.
ADVERTISEMENT
आरोपी महिला विवाहित आहे. तिला 3 मुले देखील आहेत. तथापि, ती घटस्फोट न घेता सुमारे 12 वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि दोन तरुणांसोबत तिचे अनैतिक संबंध होते. संपूर्ण प्रकरणातील चौकशीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा आरोप असलेली महिला, तिचा पहिला प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे.
हे ही वाचा>> 11 महिला आणि 12 पुरुष... सुरू होतं भलतंच काही, पोलिसांची एंट्री अन् खेळच खल्लास...
पतीपासून तीन मुले, नंतर दुसऱ्यासोबत 14 वर्षे प्रेम, तिसऱ्यासोबत 5 वर्षे...
ही कहाणी खरं तर पूर्णपणे फिल्मी आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे गुडिया नावाच्या महिलेचे लग्न झाले होते. तिला तीन मुलंही होती. नंतर ती तिच्या पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर ती दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली. ज्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध देखील होते. त्या काळात तिची नजर तिच्या प्रियकराच्या ड्रायव्हरवर पडली. ये-जा करताना ती ड्रायव्हरशी बोलू लागली. लवकरच ती ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. सुमारे 8 वर्षे प्रियकराशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर, ती ड्रायव्हरवरही प्रेम करू लागली. म्हणजेच हे तिचे तिसरे प्रेम होते.
दुसऱ्या प्रियकरापासून वेगळे होण्याचा आग्रह
ती सुमारे 5 वर्षे ड्रायव्हरसोबत होते. तिचे त्याच्याशी देखील अनैतिक संबंध होते. या काळात, ड्रायव्हर तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. भविष्यात तो या व्हिडिओंचा कसा वापर करू शकतो याची तिला कल्पना नव्हती. पण, 5 वर्ष प्रेमात पडल्यानंतर, ती ड्रायव्हरपासून वेगळे होण्याचा विचार करू लागली. ती त्याच्यापासून दूर राहू लागी.
हे ही वाचा>> आरारारारा! कपलने पडदा न लावताच सुरु केले शारीरिक संबंध..हॉटेलबाहेर अख्खा गावच जमा झाला, ट्रॅफिक जॅम अन्..
जेव्हा ड्रायव्हर तिला फोन करायचा तेव्हा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. यामुळे ड्रायव्हरला राग येतो आणि तो तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतो. तो महिलेला ब्लॅकमेल करू लागतो. व्यथित महिला तिच्या पहिल्या प्रियकराला म्हणजेच ड्रायव्हरच्या मालकाला सर्व काही सांगते. त्याच्यासोबत मिळून ती दुसऱ्या प्रियकराला संपविण्याचा कट करते. नंतर ती त्याला बाजारात बोलावते आणि त्याची हत्या करते.
कोण आहेत तीन आरोपी?
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. हत्येचा आरोप असलेल्या महिलेचे नाव गुडिया आहे. तिच्या पहिल्या प्रियकराचे नाव विजय आहे आणि या प्रकरणात अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव अश्वनी कुमार आहे. तिसरा आरोपी हा विजयचा मित्र आहे.
कधी, कुठे आणि कसा कट रचलेला?
खरं तर, बिहारची राजधानी पाटण्यात मे महिन्यात एका टँकर चालकाची हत्या करण्यात आली होती. पाटण्याला लागून असलेल्या परसा बाजारात ही हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर, परसा बाजार परिसरातील एका शेतातून मृतदेह सापडला होता. मृताची ओळख टँकर चालक सूरज कुमार (वय 30 वर्ष) अशी झाली. सूरज कुमारचा गळा दाबून आणि नंतर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. हत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासाच्या सुरुवातीला पोलिसांना प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांना कळले की मृत सूरजचे गुडिया नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. पोलीस तपासादरम्यान, गुडियाचा हत्येतील सहभाग उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान तिने सर्व काही उघड केले. तिने सांगितले की तिचे मृत सूरजसोबत 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिला त्याच्यापासून सुटका हवी होती. सूरजने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले होते. तो याद्वारे तिला ब्लॅकमेल करत होता. यातून त्रासून तिने तिचा 14 वर्षांपासून प्रियकर असलेल्या विजय कुमार याच्यासोबत मिळून सूरजची हत्या करण्याचा कट रचला.
कशी करण्यात आली हत्या?
यानंतर, एतवारपूर येथील रहिवासी विजय आणि त्याचा मित्र अश्वनी कुमार यांनी सूरजला भेटण्यासाठी बोलावले. दोघेही त्याला दुचाकीवरून परसा बाजारात घेऊन गेले. तिथे दोघांनीही सूरजला दारू पाजली. त्यानंतर त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला आणि धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपींकडून हत्येत वापरलेले शस्त्र, एक दुचाकी आणि तीन मोबाइल फोन जप्त केले. सध्या या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT
