घरासमोर वाळू टाकल्यानं वाद, डोक्यात वीट घातली, तरूणाचा अंत... जालन्यात हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 11 Jun 2025, 08:54 AM)

लिलाबाई आपल्या तीन मुलांसह तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या. त्याचवेळी राजू सुखदेव सोनुने आणि विजय सुखदेव सोनुने यांनी परमेश्वर सोनुने, दीपक सोनुने आणि सुधाकर सोनुने यांच्यावर हल्ला केला.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालन्यात शेजाऱ्यांच्या वादातून एकाचा खून

point

तरूणाच्या डोक्यात वीट मारली, उपचारादरम्यान मृत्यू

जालना : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सावरखेड़ा गावात रस्त्यावरील वादातून एका युवकावर वीट मारून जानलेवा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परमेश्वर सोनुने या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली, सुनेनं स्वत:ला संपवलं; आई-वडील म्हणाले सासू सासऱ्यांनी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरखेड़ा गावात लिलाबाई सोनुने यांच्या घरामागे सुखदेव सोनुने यांनी बांधकामासाठी रेत टाकली होती. यामुळे लिलाबाई यांना ये-जा करण्यास अडचण होत होती. याबाबत लिलाबाई यांनी राजू सुखदेव सोनुने याला रेत बाजूला करण्यास सांगितले. यावरून राजूने लिलाबाई यांच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ केली. 

कसा झाला खून? 

लिलाबाई आपल्या तीन मुलांसह तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या. त्याचवेळी राजू सुखदेव सोनुने आणि विजय सुखदेव सोनुने यांनी परमेश्वर सोनुने, दीपक सोनुने आणि सुधाकर सोनुने यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजू आणि विजय यांनी परमेश्वर याच्या डोक्यावर वीट मारून त्याला गंभीर जखमी केलं.

हे ही वाचा >> हनिमूनसाठी गेलेल्या राजाची सोनमने 'अशी' केली हत्या, हादरवून टाकणारा पोस्टमॉर्टम रिपोर्टच आला समोर

जखमी परमेश्वरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी राजू सुखदेव सोनुने आणि विजय सुखदेव सोनुने यांना अटक केली असून, गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सावरखेड़ा गावात खळबळ उडाली आहे.