हनिमूनसाठी गेलेल्या राजाची सोनमने 'अशी' केली हत्या, हादरवून टाकणारा पोस्टमॉर्टम रिपोर्टच आला समोर
बहुचर्तित राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर आली आहे. त्यातच आता राजाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टच आता समोर आला आहे.
ADVERTISEMENT

इंदूर: पत्नी सोनम रघुवंशीसह हनिमूनसाठी मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशीचा हा अंतिम प्रवास ठरला. असा आरोप आहे की, सोनमनेच मेघालयात तिच्या पतीची अत्यंत थंड डोक्याने कट रचून हत्या केली. इंदूरमधील हे जोडपे मेघालयात पोहोचण्याआधीच पत्नीने हत्येचा कट रचला होता. ज्यानुसार, तिने पती राजाला वेदनादायक मृत्यू घडवून आणला.
राजा रघुवंशीची हत्या कशी झाली?
2 जून रोजी मेघालय पोलिसांना शोध मोहिमेदरम्यान खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. राजाच्या हातावरील टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटू शकली. मृतदेह अतिशय वाईट स्थितीत आढळून आला होता. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम मेघालयातच करण्यात आले, ज्यामध्ये राजाला किती क्रूरपणे मारण्यात आले याबद्दल सर्व काही समोर आले.
हे ही वाचा>> राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण? सोनमने घरच्या नोकराला पटवलं अन्...खळबळजनक माहिती समोर!
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये राजाच्या डोक्यावर दोन वार करण्यात आल्याचे उघड झाले. हे वार धारदार शस्त्राने करण्यात आले. हे वार इतके धारदार आणि खोल होते की राजाचा मृत्यू या वारांनी झाला. एक जखम डोक्याच्या मागच्या बाजूला आणि दुसरा डोक्याच्या पुढच्या बाजूला होता. पोस्टमॉर्टममधून हे स्पष्ट झाले की, हत्येसाठी धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला होता. हत्येनंतर मृतदेह एका खोल दरीत फेकण्यात आलेला, जो पोलिसांना 2 जून रोजी सापडलेला.
घटनेची संपूर्ण माहिती
राजा आणि सोनमचे 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले होते. 20 मे रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. 22 मे नंतर दोघेही बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांची स्कूटी एका निर्जन भागात सापडली. 2 जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. पण तोपर्यंत सोनमचा कोणताही पत्ता नव्हता. NDRF टीम सोनमचा शोध घेत होती. काहीतरी अनुचित घडण्याची भीती होती.