Crime News : कासारगोडमधून धक्कादायक घटना समोर आलीये. 26 डिसेंबर रोजी विवाह होणार असलेल्या तरुण आणि तरुणीचाही मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. दोघांचे मृतदेह बुधवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. पल्लिक्कारा येथील पी. अनुस्री (वय 25) ही म्हैसूरमधील हुन्सूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काम करत होती. ती हुन्सूरमधील भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृतदेहही एर्नाकुलममध्ये आढळून आला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रक्तरंजित कांड, बापाने पोटच्या मुलींना संपवले; नेमकं कारण काय?
दोघांचेही मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ
अनुस्रीचा होणारा नवरा अमल (वय 26) हा एर्नाकुलममधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कार्यरत होता. त्याचा मृतदेह नंतर नॉर्थ रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलच्या खोलीत छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांचा विवाह 26 डिसेंबर रोजी होणार होता. त्यामुळे एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचे मृतदेह आढळल्याने या घटनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : राहुल गांधींनी बोलावलं.. थेट मिठी मारली आणि नंतर.. सगळे हसत राहिले..
अनुस्रीने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडीओ
मिळालेल्या वृत्तानुसार, अनुस्रीने मृत्यूपूर्वी अमलला व्हिडिओ कॉल केला होता. मात्र, दोघांच्या मृत्यूचा परस्पर संबंध असल्याचे किंवा त्यांच्या मृत्यूमागील परिस्थिती काय होती, याबाबत अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही घटनांमधील नेमका संबंध स्पष्ट झालेला नाही. अनुस्री कासारगोडमधील कट्टमपल्ली येथील रहिवासी होती, तर अमल हा कन्नूरमधील विलामना येथील रहिवासी होता.
अनुस्रीचा मृतदेह हुन्सूर येथील देवराज उर्स रुग्णालयात नेण्यात आला. बुधवारी दुपारी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, अमलचा मृतदेह नॉर्थ रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलच्या खोलीत आढळून आल्याचे समोर आले आहे. दोघांच्या मृत्यूबाबत अधिकृतरीत्या कोणताही परस्पर संबंध निश्चित करण्यात आलेला नसून, उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या मृत्यूची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
ADVERTISEMENT












