Crime news : सावत्र बापानेच एका आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. नराधम बाब हा सतत तिच्यासमोर नग्न अवस्थेत उभे राहायचा. या प्रकरणी आता पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठून आरोपी नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपीवर एफआरआय दाखल करत आरोपीला अटक केली. ही घटना उत्तर प्रदेशातील नोएडा फेज-वन क्षेत्रातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चिकनमध्ये कंडोम आढळल्याचा जोडप्याचा आरोप, रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
8 वर्षांच्या मुलीसमोर नग्नवस्थेत सावत्र बाप उभा
फेज-वन पोलीस ठाणे अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे क्षेत्रातील जेजे कॉलनीमध्ये एक व्यक्ती आपल्या 8 वर्षांच्या सावत्र मुलीसोबत राहत होता. गुरूवारी दुपारी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेनं पोलिसांना या घटनेची एकूण माहिती सांगितली. पीडिता म्हणाली की, आरोपी बाप हा मुलीसमोर आपले कपडे काढून नग्नवस्थेत उभा राहिला. जेव्हा ती खोलीत पोहोचली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. नंतर बायकोने विरोध केला असता, तिला देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अशातच आई आपल्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली.
आईनं घडलेला सर्व प्रकार कॅमेऱ्यात केला कैद
पोलिसांनी महिलेच्या तक्कारीवर आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला, दरम्यान आरोपीला पकडण्यासाी पोलिसांनी आपले पथक तयार केले आणि पाठवले. काही वेळांतच आरोपी वडील हा पोलीस ठाणे परिसरात पोलिसांच्या तावडीत सापडला. नंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पीडितेच्या या प्रकरणावर गुन्हा दाखल केला. तसेच मुलीचा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला जाईल आणि पुढील कारवाई केली जाणार आहे.
हे ही वाचा : शिक्षक नवऱ्याने बायकोला पाण्यात बुडवून मारलं, आरोपीनं बनाव रचला पण..
दरम्यान, मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. चाईल्ड सेक्ससंदर्भात दिवसाआड घटना घडताना आढळून येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय.
ADVERTISEMENT












