नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळाली, पण शेवटी सुटकेसमध्ये सापडली बॉडी

मुंबई तक

12 Aug 2026 (अपडेटेड: 12 Aug 2026, 02:32 PM)

Crime News : 20 वर्षीय छोटीकुमारी उपाध्याय हिची तिच्या प्रियकरानेच हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह ट्रॉली बॅगेत लपवून फरार झालेल्या आरोपीला वाराणसीत अटक करण्यात आली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळाली

point

पण शेवटी सुटकेसमध्ये सापडली बॉडी

Crime News : बिहारच्या नवादा जिल्ह्यातील 20 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकरानेच हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. छोटीकुमारी उपाध्याय असं या विवाहित तरुणीचे नाव होते. मात्र, त्याच गावातील ऋषभ कुमार सिंह याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. छोटीकुमारीच्या आग्रहावरून दोघांनी गाव सोडून दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथे दोघांनी लग्न केले. मात्र, त्यांच्या या नात्याला दोन्ही कुटुंबांचा विरोध होता आणि छोटीकुमारीच्या कुटुंबीयांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला होता. ऋषभविरोधात अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर जरांगेंना वापरायला दिली, टीकेनंतर मालक समोर, सगळं बोलले...

रागाच्या भरात ऋषभने छोटीकुमारीचा गळा आवळून संपवलं 

लग्नानंतर छोटीकुमारीने ऋषभला पुन्हा आपल्या गावात परतण्यास वारंवार सांगितले. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 9 जूनच्या सकाळीही दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्याच दिवशी संध्याकाळी रागाच्या भरात ऋषभने छोटीकुमारीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने छोटीकुमारीच्या मृतदेहाला दोरीने बांधले, प्लास्टिकमध्ये गुंडाळले आणि तो एका ट्रॉली बॅगमध्ये भरला.

हेही वाचा : Personal Finance: 50,000 रुपये पगारात मुंबईत घर घेता येईल का? समजून घ्या पूर्ण गणित!

बॅगेतून दुर्गंधी येत असल्याने बॅग उघडली अन् सापडली बॉडी 

यानंतर ऋषभने खोलीला कुलूप लावले आणि दादरा आणि नगर हवेलीमधून फरार झाला. तो वाराणसीला पोहोचला आणि तेथे आपली ओळख लपवून एका खासगी कंपनीत मजूर म्हणून काम करू लागला. दरम्यान, बंद असलेल्या खोलीत छोटीकुमारीचा मृतदेह ट्रॉली बॅगेतच पडून होता. या हत्येचा प्रकार जवळपास दोन महिन्यांनी, 3 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. घरमालकाला ही खोली दुसऱ्या भाडेकरूला द्यायची होती. त्यामुळे त्याने बंद खोली उघडली. यावेळी बाथरूममध्ये ठेवलेल्या ट्रॉली बॅगेतून दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर बॅग तपासल्यानंतर त्यामध्ये छोटीकुमारीचा मृतदेह आढळून आला.

घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांना ऋषभ वाराणसीमध्ये असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाराणसीतील एका खासगी कंपनीवर छापा टाकला. त्यावेळी ऋषभ तेथे काम करत असल्याचे आढळून आले. मात्र, तो बदललेल्या नावाने तेथे राहत आणि काम करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. छोटीकुमारीच्या हत्येनंतर जवळपास दोन महिन्यांनी ऋषभ कुमार सिंह पोलिसांच्या ताब्यात आला आहे.