Crime News : मध्य प्रदेशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने विद्यार्थिनीला कोचिंग सेंटरमध्ये सोडण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले अन् हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपीसह हॉटेल मॅनेजरलाही अटक केली आहे. मुख्य आरोपीसह हॉटेल मॅनेजरलादेखील अटक केली आहे.
ADVERTISEMENT
चल तुला क्लासपर्यंत सोडतो...
ही घटना 3 ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुभाष नगर परिसरातील रहिवासी असलेला आरोपी लक्की सोनी याने अल्पवयीन विद्यार्थिनीला कोचिंगला सोडण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर वाटेत तिला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. यावरून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा : रस्ते अपघाताचा बनाव, लव्ह मॅरेज करुनही पत्नीला संपवलं, असं घडलं तरी काय?
हॉटेल मॅनेजरला अटक का?
या प्रकरणाच्या तपासादरम्यान हॉटेल प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली. ओळखपत्राची पडताळणी न करताच आरोपीला खोली उपलब्ध करून देण्यात आली होती, तसेच नियमानुसार याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना ती देण्यात आली नव्हती. या निष्काळजीपणाबद्दल पोलिसांनी करौली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हॉटेल मॅनेजर धूप सिंग गुर्जर यालाही अटक केली आहे. सध्या हॉटेल सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात होते की नाही, याची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ताटकळत ठेवल्याची चर्चा, आता राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
विद्यार्थीनीचा जबाब
पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा, बलात्कार आणि धमकी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. अनंतपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करत असून, तपासात अन्य कोणाचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई केली जाईल. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT












