पत्नीला घर मालकासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, अन् नंतर भयानक कांड घडलं!

मुंबई तक

10 Aug 2026 (अपडेटेड: 10 Aug 2026, 04:06 PM)

Crime News : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला अॅसिड पाजल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीला घर मालकासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं

point

अन् नंतर भयानक कांड घडलं!

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीलाच अॅसिड पाजल्याचा आरोप असून, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मृत्यू होण्यापूर्वी इसराइल याने पोलिसांना जबाब देत घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली होती. ही घटना बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगी नवादा परिसरातील असल्याचे सांगण्यात आले आहे. इसराइल याचा गौसियासोबत 13 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सुरुवातीची काही वर्षे दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत होते. मात्र, त्यानंतर कुटुंबात वाद सुरू झाले. कुटुंबातील वाटणी झाल्यानंतर इसराइलच्या आईने त्याला हिस्सा दिला होता. काही दिवसांनी इसराइलने घर सोडून भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : नांदेड : 'तू मला मनोरुग्ण ठरवतेस'; रागातून आईची हत्या, मग मुलाने केली आत्महत्या

घरमालकासोबत अनैतिक संबंध, पत्नीने नवऱ्याला संपवलं 

कुटुंबीयांच्या आरोपानुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी इसराइलला पत्नी गौसियाचे घरमालक सलीम नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. एका दिवशी इसराइलने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर इसराइलने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, कुटुंबीयांनी त्याला वाचवले. या प्रकारामुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याने गौसियाने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिने प्रियकर सलीमसोबत मिळून इसराइलला अॅसिड पाजल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अॅसिड प्यायल्यानंतर इसराइलची प्रकृती गंभीर झाली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : नांदेड : 'तू मला मनोरुग्ण ठरवतेस'; रागातून आईची हत्या, मग मुलाने केली आत्महत्या

अॅसिड पाजल्याने पतीचा उपचारादरम्यान मृत्यू 

मृतकाची आई बारिशा यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा हिस्सा घेऊन घरातून बाहेर पडला होता. त्याचदरम्यान सुनेचे सलीम नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचे समोर आले. त्यांच्या मुलाने सलीमला रंगेहाथ पकडल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर बदनामीमुळे इसराइलने फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुटुंबीयांनी त्याला वाचवले. त्यानंतर बदनामीच्या भीतीने सुनेने सलीमसोबत मिळून इसराइलला अॅसिड पाजल्याचा आरोप बारिशा यांनी केला. तेजाब पाजल्यानंतर इसराइलवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी इसराइलने पोलिसांना जबाब दिल्याचेही सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीओ आशुतोष शिवम यांनी सांगितले की, रुग्णालयाकडून पोलिसांना मेमो प्राप्त झाला होता. चक मेहमूद, बारादरी परिसरातील रहिवासी इसराइल याचा अॅसिड प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यातून समोर आले. मृतकाच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याला अॅसिड पाजल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला जात आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, इसराइलला अॅसिड पाजल्याच्या आरोपाची तपासणी केली जात आहे.