Nanded Crime News : नांदेड शहरातील तरोडा भागातील राहुल कॉलनीमध्ये शनिवारी रात्री उशिरा आई आणि मुलाच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रतीक चौथरे (24) आणि त्याची आई भारती चौथरे (52) अशी मृतांची नावे आहेत. प्रतीकने बॅट आणि रॉडने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात भारती चौथरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रतीकने घरातील दुसऱ्या खोलीत छताच्या हुकाला आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतीकवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. तो औषधे घेत नसल्याने आई जेवणातून आपल्याला औषधे देत असल्याचा संशय त्याला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. याच कारणावरून तो आईसोबत अनेकदा वाद घालत होता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नाशकात एकामागून एक भुकंपाचे धक्के, घर सोडून लोकं पळाले, रात्री उशिरा काय घडलं?
आईची हत्या केल्यानंतर मुलाने घेतला गळफास
राहुल कॉलनीतील बालाजी सोपान चौथरे हे सीआरपीएफमध्ये पाँडिचेरी येथे कार्यरत आहेत. त्यांची मुलगी प्राची पुणे येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भारती चौथरे आणि प्रतीक हे दोघेच राहत होते. प्रतीकची मानसिक स्थिती खालावत असल्याने त्याला नांदेडमधील एका मनोविकार तज्ज्ञाकडे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, आपण मनोरुग्ण नसल्याचे सांगत तो आई-वडिलांशी वाद घालत असे. शनिवारी रात्री त्याने घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आणि आईवर बॅट व रॉडने हल्ला केला. आईची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेतला. भाग्यनगर पोलिसांत प्रतीकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'मामी, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय...' भाचा पाठ सोडेना; शेवटी घडलं भयंकर
आईने बनवलेले जेवण खाण्याबाबतही संशय, बाहेरुन मागवायचा जेवण
प्रतीकला आईने बनवलेले जेवण खाण्याबाबतही संशय होता. त्यामुळे तो घरी जेवण न करता ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवत असे. आई-वडील आपली वैयक्तिक माहिती इतरांना देत असल्याचा रागही त्याच्या मनात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. 9 ऑगस्टला सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजा बंद असल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी प्रतीकच्या मामाला फोन करून माहिती दिली. मामा तातडीने घटनास्थळी पोहोचले. इतरांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत गेल्यानंतर भारती चौथरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर प्रतीकचा शोध घेतला असता तो दुसऱ्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती भाग्यनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे पाठवले.
प्रतीकने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि गेल्या काही वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जाण्याची त्याला आवड होती. स्पर्धा परीक्षेतून त्याने रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि आगामी आठ दिवसांत तो रेल्वेच्या सेवेत रुजू होणार होता. मात्र, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली. प्रतीकने यापूर्वी वडिलांवरही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
ADVERTISEMENT












