प्रेयसीची हत्या करून मृतदेह पेटवला, इन्स्टावाल्या लव्हस्टोरीचा भयानक एन्ड का झाला?

मुंबई तक

10 Aug 2026 (अपडेटेड: 10 Aug 2026, 02:49 PM)

instagram love story : इन्स्टाग्रामवरून सुरू झालेल्या पाच वर्षांच्या प्रेमसंबंधाचा आंध्र प्रदेशात भीषण अंत झाला. दुसऱ्या पुरुषाशी बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

instagram love story

instagram love story

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीची हत्या करून मृतदेह पेटवला

point

इन्स्टावाल्या लव्हस्टोरीचा भयानक एन्ड का झाला?

instagram love story  : आंध्र प्रदेशातील पलनाडु जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून सुरू झालेल्या प्रेमकथेचा अतिशय धक्कादायक अंत झाला आहे. दुसऱ्या पुरुषाशी बोलत असल्याच्या संशयातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने आधी प्रेयसीला विश्वासात घेऊन एका निर्जन ठिकाणी बोलावले. त्यानंतर तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावली आणि घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?

मिळालेल्या माहितीनुसार, चिलाकलुरिपेट येथील हसीना ही गुंटूर जिल्ह्यातील मितलापल्ली येथील एका महाविद्यालयातून बी.टेकचे शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिची इंस्टाग्रामच्या माध्यमातून पलनाडु जिल्ह्यातील करमपुडी मंडलमधील इनुपराजुपल्ली येथील बाला सैदुलु याच्याशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूप प्रेमसंबंधात झाले. दोघेही मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. बी.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हसीनाला सुल्लुरपेट येथील एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. दुसरीकडे बाला सैदुलु हा आपल्या गावातच राहून शेतीचे काम करत होता. हसीनाला नोकरी मिळाल्यानंतर तिचे काम वाढले आणि बाला सैदुलुशी तिचा संवाद कमी झाला.

हेही वाचा : निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?

निर्जन ठिकाणी बोलावून हत्या, मृतदेह पेटवला 

हसीना कामात व्यस्त राहू लागल्याने बाला सैदुलुला ती आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय येऊ लागला. तसेच ती अन्य कोणत्या पुरुषाच्या संपर्कात असल्याचा संशय त्याला होता. याच संशयातून त्याने हसीनाच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. ठरलेल्या योजनेनुसार त्याने हसीनाला सुल्लुरपेट येथून चिलाकलुरिपेट येथे बोलावून घेतले. हसीना तेथे आल्यानंतर त्याने तिला विनवणी करून करमपुडी येथे येण्यासाठी तयार केले. त्यानंतर तो तिला नागार्जुन सागर कालव्याजवळील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे दोघांमध्ये बातचीत सुरू असताना बाला सैदुलुने सोबत आणलेल्या धारदार चाकूने हसीनावर वार केले. या हल्ल्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावली आणि तेथून पळ काढला.

पोलिसांनी प्रियकराला कसं पकडलं? 

हसीना घरातून बाहेर पडल्यानंतर वेळेत परतली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना अनहोनीची शक्यता वाटली. त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असतानाच करमपुडी मंडलमधील नागार्जुन सागर कालव्याच्या तटबंधावर एक अज्ञात, अर्धवट जळालेला आणि सडलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे या मृतदेहाची ओळख हसीना म्हणून करण्यात आली. त्यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी बाला सैदुलुला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.