Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या महानंदा एक्सप्रेसमध्ये एका 20 वर्षांच्या गरोदर आदिवासी महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला आपल्या गावी जात असताना दिव्यांग डब्यात ही घटना घडली. डबा बहुतांश रिकामा असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
'असा' सापडला आरोपी
ट्रेन हसिमारा स्टेशनजवळ असताना शेजारच्या डब्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलेचा आरडाओरडा ऐकला. त्यांनी तत्काळ रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क साधून सुरक्षारक्षकांना सतर्क केले. दरम्यान, पीडित महिलेने फोनवरून पतीलाही या प्रकाराची माहिती दिली. ट्रेन अलिपूरदुआर स्टेशनवर पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) यांनी पीडितेची सुटका करून आरोपीला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : मॉनिटर बदलल्याने शाळेत खून, घटनेचा रक्तरंजित थरार
आरोपी आसामचा रहिवासी
आरोपी हा आसाममधील रंगिया येथील रहिवासी आहे. गौतम महातो असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. जीआरपीचे पोलीस अधीक्षक इंद्रबदन झा यांनी सांगितले की, रेल्वेच्या इलेक्ट्रिक कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांना त्वरित कारवाई करणे शक्य झाले.
हे ही वाचा : तरुणानं अंघोळीचा व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग अन्..
पाच दिवसांची पोलीस कस्टडी
अटक करण्यात आलेल्या आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून पोलीस सध्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या प्रवासातील सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT












