ब्रम्हकुमारी सेंटरमधील महिला, तरुणाचं एकतर्फी प्रेम; अन् आश्रम मालकाची हत्या

मुंबई तक

12 Aug 2026 (अपडेटेड: 12 Aug 2026, 08:59 AM)

Pune Crime News : पुण्यातील बाणेरमध्ये एकतर्फी प्रेमातून घनश्याम यांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेचे घनश्यामसोबत संबंध असल्याचा संशय घेत सोलोमन शेंडगे याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ब्रम्हकुमारी सेंटरमधील महिला

point

तरुणाचं एकतर्फी प्रेम; अन् आश्रम मालकाची हत्या

Pune Crime News : पुण्यातील बाणेरमध्ये एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. बाणेरमधील एका मेडिटेशन सेंटरमध्ये अध्यात्माच्या मार्गावर असलेली एक महिला श्रद्धेने राहात होती. तिच्यावर सोलोमन सूर्यभान शेंडगे याचे प्रेम होते. दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखत होते. शेंडगेने या महिलेसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, संबंधित महिलेने आपण आता अध्यात्माच्या मार्गावर असल्याचे सांगत लग्नाला नकार दिला. त्यानंतर शेंडगे नाराज झाला. गेल्या सहा महिन्यांपासून तो महिलेला मेसेज आणि फोन करत असल्याचे तिचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबईकरांनो सांभाळा, पुढील काही तास तुफान पाऊस.. समुद्रानजीक Rain Bands सक्रिय

महिलेचे आश्रम चालकासोबत संबंध असल्याचा संशय, अन् केली हत्या 

या महिलेचा आश्रम चालक घनश्याम नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय शेंडगेला होता. ज्या जागेवर हे मेडिटेशन सेंटर सुरू होते, ती जागा घनश्यामच्या कुटुंबाची होती. घनश्याम अनेक वर्षांपासून ब्रह्मकुमारी आश्रमाच्या सेवेत होता. तो या सेंटरमध्ये अकाउंटिंगचे कामही करत होता. या सेंटरसाठी घनश्यामच्या कुटुंबाने बाणेरमधील पाच गुंठे जमीन तात्पुरत्या वापरासाठी दिली होती. घनश्यामला यापूर्वी शेंडगेकडून त्रास होत असल्याचे त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते.

हेही वाचा : Pune: मिसिंग लिंकबाबत मोठी अपडेट, प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा नाहीतर होईल घोळ!

शेंडगेकडून घनश्यामवर धारदार शस्त्राने हल्ला

घटनेच्या रात्री शेंडगे मेडिटेशन सेंटरजवळ आला. त्यावेळी त्याने घनश्यामला शिवीगाळ केली. संबंधित महिलेने त्याला याबाबत तक्रार करण्यास सांगितले. त्यावर शेंडगेने राग व्यक्त करत धमकी दिल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर महिला मोबाईल आणण्यासाठी आत गेली. त्याचवेळी शेंडगेने घनश्यामवर धारदार शस्त्राने हल्ला केला. घनश्याम पुढे पळत असताना शेंडगे त्याच्या मागे धावत गेला. त्याने पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात घनश्याम गंभीर जखमी झाला. घनश्यामच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घनश्याम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घनश्यामच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सोलोमन सूर्यभान शेंडगे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात संबंधित महिलेचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शेंडगे आणि संबंधित महिलेचे मोबाईलवरील मेसेज, त्यांच्यात झालेले फोन आणि कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले जात आहेत. महिलेने शेंडगे आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांच्यात नेमके कोणत्या विषयावर बोलणे होत होते, किती वेळा फोन झाले आणि कोणाचे कोणाला फोन गेले, याची माहिती तांत्रिक तपासातून समोर येणार आहे. या तपासानंतर या प्रकरणामागचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे.