Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोतवाली क्षेत्रातील नासीरपीर भागात 8 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. येथील प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप कुमार यादव याने आपल्या दोन भावांच्या मदतीने पत्नी शालिनी हिची हत्या केली. आरोपीने पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तिच्या डोक्यात कुकर घातला, तसेच तिची मान धरून तिला पाण्याच्या टबमध्ये बुडवून मारून टाकले. हत्येनंतर हा प्रकार केवळ एक अपघात असल्याचे भासवण्यासाठी तो मृतदेह रुग्णालयात घेऊन गेला आणि तिथे रडण्याचे नाटकही केले.
ADVERTISEMENT
आधी प्रेमविवाह, नंतर वाद
या घटनेचा उलगडा करताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी दिलीप याने 8 ऑगस्टच्या सकाळी ही घटना घडवून आणली. कुकरचा हल्ला करून आणि पाण्यात बुडवून मारल्यानंतर तो सुमारे 20 मिनिटे बाहेर फिरत राहिला. त्यानंतर परत येऊन त्याने भावांना फोन केला आणि पत्नी अपघातात बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला. मृतका शालिनी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. दिलीप आणि शालिनी यांनी 3 डिसेंबर 2017 रोजी प्रेमविवाह केला होता. परंतु, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वादाच्या ठिणग्या उडत होत्या. संशयाच्या भरात आणि रागाच्या भरातच हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.
हे ही वाचा : अमित शाह यांची विरोधकांना विनंती, राहुल गांधी थेट आरोप करत काय बोलून गेले?
वडिलांनी आरोप फेटाळले
मृत महिलेच्या वडिलांनी, धर्मराज यादव यांनी मात्र आरोपी पतीने लावलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. आपल्या मुलीचे कोणाशीही प्रेमप्रकरण नव्हते, असे ठामपणे सांगत त्यांनी पोलीस तपासाचे समर्थन केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 पासून दोघांमध्ये वाद सुरू होता. कारण आरोपी दिलीप याचे स्वतःच्याच शाळेतील एका महिला शिक्षिकेशी अनैतिक संबंध होते. शालिनीने ही बाब कौटुंबिक पातळीवर सांगितली होती. दिलीपला समजावण्याचा प्रयत्न करूनही तो आपल्या सवयींपासून मागे हटला नाही आणि उलट शालिनीवरच खोटे आरोप लावत राहिला.
हे ही वाचा : सिब्बलांचे पाच महत्त्वाचे मुद्दे ठाकरेंना जिंकून देणार? राऊतांनी नेमकं काय सांगितलं?
आरोपीला हत्यारासह अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेंसिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावले. 9 ऑगस्ट रोजी नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी तपासाचे धागेदोरे जुळवत मुख्य आरोपी दिलीप यादव याला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक केली. 12 ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावून तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












