बायकोचा राग काढला वडिलांवर, डोक्यात खुर्ची घालून संपवले; नेमकं काय घडलं?

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काही कारणावरुन नवरा बायकोचा वाद सुरु होता. यावेळी उपस्थित असलेले नातेवाईक आणि आरोपीचे वडील मध्यस्थी करायला गेले. यानंतर संतापलेल्या आरोपीने काय केलं, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:35 PM • 08 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोचा राग काढला वडिलांवर

point

डोक्यात खुर्ची घालून संपवले

point

नेमकं काय घडलं?

Crime News : केरळमची राजधानी तिरुवनंतपुरममधील अंबूरी परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बुधवारी (6 मे) रात्री लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच एका तरुणाचे आपल्या पत्नीसोबत जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर भीषण हिंसेत झाले आणि संतापलेल्या मुलाने मध्यस्थी करणाऱ्या नातेवाईकावर आणि स्वतःच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा शानू याला अटक केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

बायकोसोबत वाद, राग काढला पाहुण्यावर

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख थॉमस अब्राहम (65) म्हणून झाली आहे. घटनेच्या दिवशी आरोपी शानू आणि त्याच्या पत्नीच्या लग्नाचा वाढदिवस होता. आनंदाच्या वातावरणात अचानक काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली. हा वाद इतका विकोपाला गेला की कुटुंबातील नातेवाईक वर्गीज यांनी मध्यस्थी करून शानूला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात असलेल्या शानूने वर्गीज यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

हे ही वाचा : नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक, पुढे काय होणार?

वडिलांच्या डोक्यात घातली खुर्ची

आपल्या नातेवाईकावर हल्ला झाल्याचे पाहून वडील थॉमस अब्राहम यांनी मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला. वडिलांचा हस्तक्षेप शानूला सहन झाला नाही आणि त्याने जवळच असलेली खुर्ची उचलून वडिलांच्या डोक्यात जोराने प्रहार केला. या भीषण हल्ल्यात थॉमस यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुटुंबातील इतर सदस्यांनी तातडीने दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी थॉमस अब्राहम यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा : 'ती' मुलाला शाळेत सोडवून घरी येत होती, भाजप नेत्याने भर रस्त्यात अडवून केलं नको 'ते'

नातेवाईकाची प्रकृती चिंताजनक

घटनेची माहिती मिळताच वेल्लारडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी शानूला ताब्यात घेतले. जखमी वर्गीज यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी शानूविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. वडिलांचा मृतदेह पोस्ट मार्टमनंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडलेल्या या खुनी खेळामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.