मार्केटमध्ये नवा स्कॅम... गूगल पेचा अधिकारी सांगून दुकानात गेला, मशिन अपडेट करायचं म्हणत डाव टाकला, घटना काय?

आपण गूगल पेचा प्रतिनिधी असल्याचं त्याने सांगितलं. त्याने अंसारी यांना विचारलं की, त्यांचं डिजिटल पेमेंट सिस्टम अपडेट केलं आहे का? फोनपे ॲप वापरणाऱ्या अंसारी यांनी सिस्टम अपडेट नसल्याचं सांगितलं.

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:16 AM • 20 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

फसवणूक करण्याचा नवा पॅटर्न

point

दुकानदाराला 10 हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न

point

दुकानदाराला संशय आल्यामुळे कसं उघड झालं प्रकरण?

मुंबई : कुर्ला परिसरातील एका टेलरिंग दुकानदाराला फसवण्याचा प्रयत्न समोर आल्यानंतर एक मोठं प्रकरण उजेडात आलंय. डिजिटल पेमेंट ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या तरुणाला वी. बी. नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने स्वत:ला गूगल पेचा अधिकारी असल्याचं सांगून दुकानदाराकडून 10,000 रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचलं का?

आरोपीची मोडस ऑपरेंडी काय? 

दुकानदार मैइनुद्दीन सज्जाद अंसारी यांची कुर्ल्यात शिलाईची दुकान आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी इमान इलियास खान नावाचा तरुण त्यांच्या दुकानात आला. आपण गूगल पेचा प्रतिनिधी असल्याचं त्याने सांगितलं. त्याने अंसारी यांना विचारलं की, त्यांचं डिजिटल पेमेंट सिस्टम अपडेट केलं आहे का? फोनपे ॲप वापरणाऱ्या अंसारी यांनी सिस्टम अपडेट नसल्याचं सांगितलं.

हे ही वाचा >> भरदिवसा नग्न झाले आणि स्मशानभूमीत केला अघोरी प्रकार, कोल्हापुरातील विचित्र घटना काय? CCTV समोर

यावर खानने त्यांना धमकावलं की, अपडेट न केल्यास व्यवहार थांबू शकतात आणि त्यांचा मोबाइल फोन मागितला. अंसारी यांनी फोन अनलॉक करून त्याला दिला. खानने काही वेळ फोनवर काम करण्याचा दिखावा केला आणि अपडेट 10-15 मिनिटांत पूर्ण होईल असं सांगून निघून गेला.

दुकानदाराला 10 हजारांचा गंडा घातला, पण... 

अंसारी यांना संशय आल्यानं त्यांनी तात्काळ व्यवहार तपासले. त्यावेळी त्यांना 10,000 रुपये दुसऱ्याच्या खात्यात टाकल्याचं आढळलं. त्यांनी याचा विरोध केला असता, खानने चूक झाल्याचं सांगून कोणाला तरी फोन केला. काही वेळातच 10,001 रुपये अंसारी यांच्या खात्यात परत आले.

हे ही वाचा >> लाखाचे कोटी करुन देतो म्हणत फसवणूक, पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकल्यावर सापडली, कवटी, दोरे...

मात्र, अंसारी यांनी सावधगिरी बाळगत पोलिसांना माहिती दिली. वी. बी. नगर पोलिसांनी इमान इलियास खान याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि खोटी ओळख सांगण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp