आधी नवऱ्याला संपवलं अन् नंतर पोहोचली मंदिरात, नीलमने असं का केलं?

मुंबई तक

• 07:11 AM • 09 Jun 2026

एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या दारुड्या नवऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केली. हत्या करुन ती जवळ असलेल्या देवळात गेली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आधी नवऱ्याला संपवलं अन् नंतर पोहोचली मंदिरात

point

नीलमने असं का केलं?

Crime News : एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या दारुड्या नवऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केली. मृत नवऱ्याचे नाव दीनदयाल कुशवाहा असे असून, घटनेपूर्वी तो आपल्या पत्नीच्या माहेरी गेला होता. तिथे दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले आणि रागाच्या भरात पत्नीने पतीवर जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील छतरपूर परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

आठ तास मृतदेहाजवळ बसली

नवऱ्याची हत्या करणाऱ्या महिलेची ओळख नीलम कुशवाहा अशी झाली आहे. नीलमने घरात असलेल्या लाठी आणि काठीने पती दीनदयालवर एकामागून एक अनेक वार केले. या भीषण हल्ल्यात दीनदयाल रक्तबंबाळ झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या धक्कादायक कृत्यानंतर नीलम पळून गेली नाही, तर पश्चात्तापाच्या भावनेत तब्बल आठ तास पतीच्या मृतदेहाजवळच बसून राहिली.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफी धुळफेक करणारी, शेतकरी का संतापले?

देवासमोर मागितली माफी

आठ तासांनंतर मृतदेहाजवळून उठून नीलमने जवळच असलेल्या एका मंदिरात धाव घेतली. तिथे ती देवाच्या मूर्तीसमोर सुमारे 10 मिनिटे शांतपणे बसून राहिली आणि आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याबद्दल देवाकडे माफी मागत राहिली. देवासमोर नतमस्तक झाल्यानंतर ती सरळ सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

हे ही वाचा : 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?

आणि  पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये

नीलम रात्री 8 च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने तेथील स्टेशन हाऊस ऑफिसरला (एसएचओ) आपण पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना घराच्या आत खाटेवर दीनदयालचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास केला जात आहे.