धुळे : बायकोसमोर रागावल्याने मुलगा संतापला, डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची हत्या

मुंबई तक

16 May 2026 (अपडेटेड: 16 May 2026, 08:49 AM)

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत एका मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Dhule Crime

Dhule Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

धुळे : बायकोसमोर रागावल्याने मुलगा संतापला

point

डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची केली हत्या

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत एका मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंदाराम आणि रंजू देवी असे या दुर्दैवी मृत दांपत्याचे नाव आहे. 

हे वाचलं का?

मुलीचे लग्न पार पाडून घरी परतले अन्..

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल (15 मे)  हा भयंकर प्रकार घडला. आपल्या मुलीचे लग्न पार पाडून हे दांपत्य आनंदाने घरी परतले होते. मात्र, घरी आल्यानंतर कोणत्यातरी कारणावरून आई-वडिलांनी मुलाला त्याच्या पत्नीसमोर सुनावले. या कथित अपमानाचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी मुलाने रागाच्या भरात थेट घरात ठेवलेल्या मुसळाने दोघांच्याही डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने इंदाराम आणि रंजू देवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : वडील बाहेर गेले, चुलत भावाला पोत्यात काहीतरी दिसलं, अन्... भयंकर कांड उघडकीस

पळून जाण्याचा प्रयत्न फसला

​या अनपेक्षित आणि क्रूर हल्ल्यानंतर संशयित आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या परिसरातील जागरूक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

हे ही वाचा : महिलांचे अर्तवस्त्र चोरायचा नाद, काकाने रंगेहात पकडताच भयंकर घडलं!

मुलीच्या लग्नानंतर शोककळा 

याप्रकरणी शिरपूर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे. ज्या घरात काही तासांपूर्वीच मुलीच्या लग्नाची मंगलमय चर्चा आणि आनंदाचे वातावरण होते, तिथेच आता आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मोठी शोककळा पसरली असून संपूर्ण धुळे जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.