"माझे पती मला शारीरिक सुख..." तरूणीचा 'तो' आरोप अन् पत्नीने उघड केले सगळेच पत्ते!

एका प्रोफेसरवर बलात्काराचा गंभीर आरोप लावण्यात आला होता. पण आता, आरोपीच्या पत्नीने तिच्या पतीच्या बचावासाठी धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे.

My husband was happy with me Professor accuses husband of rape Wife reveals everything

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक

मुंबई तक

06 Nov 2025 (अपडेटेड: 06 Nov 2025, 06:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"माझे पती मला शारीरिक सूख..." पत्नीने सगळंच सांगितलं

point

प्रोफेसर पतीवर विद्यार्थीनीने केला बलात्काराचा आरोप!

Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका प्रोफेसरवर बलात्काराचा गंभीर आरोप लावण्यात आला होता. पण आता, आरोपीच्या पत्नीने तिच्या पतीच्या बचावासाठी धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे. तिने प्रेस कॉन्सफरन्स घेऊन म्हटलं की "जर माझा पती माझ्यासोबत खूश असेल तर तो दुसऱ्या कोणाकडे का जाईल?" नेमकं काय घडलं? 

हे वाचलं का?

प्राध्यापकावर विद्यार्थीनीने केला बलात्काराचा आरोप 

26 ऑक्टोबर रोजी, पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने न्यू आग्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळी, विज्ञान विभागातील केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक आणि तिचे पीएचडी को-सुपरवायझर गौतम जैसवार यांनी लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला. विवाहित असूनही, त्यांनी मला खोटी आश्वासनं दिली. त्याने माझ्यावर बऱ्यादा बलात्कार केला. ते म्हणायचा की ते आपल्या वैवाहिक जीवनात खूश आणि त्यांची पत्नी चांगली नाही. त्यामुळे, त्यांनी पीडितेला लग्नाचं आश्वासन दिलं आणि ती आरोपीच्या बोलण्यात आली. पीडितेने तक्रार करत सांगितलं की, 25 ऑक्टोबर रोजी, प्रोफेसरने मला पुन्हा त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले. माझी फसवणूक करत असल्याबद्दल मी त्यांना जाब विचारला आणि तेव्हा ते संतापला. त्यावेळी, त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझा मोबाईल फोन तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मेडिकल टेस्टमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, लेडी लॉयल रुग्णालयात मेडिकल टेस्ट करण्यात आली होती, परंतु डॉक्टरांनी योग्यरित्या तपासणी केली नाही. 

हे ही वाचा: यूट्यूबर तरुणीने आपल्या आईलाच केली बेदम मारहाण! नंतर, घरच्यांनी सांगितली चकित करणारी कहाणी...

आरोपीची पत्नी नेमकं काय म्हणाली? 

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रोफेसर गौतम यांच्याविरुद्ध बलात्काराचा FIR नोंदवला. 27 ऑक्टोबर रोजी पीडित विद्यार्थिनीची मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि तिचा जबाब नोंदवण्यात आला. आरोपी प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं. पाच दिवसांनंतर, पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला वाराणसीतून अटक केली आणि आरोपी सध्या तुरुंगात असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पतीला तुरुंगात पाहून त्यांची पत्नी कविता संतापली. तिने पत्रकारांना सांगितलं की, "माझा नवरा माझ्यासोबत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूश आहे. मग तो दुसऱ्या महिलेकडे का जाईल? इतर विद्यार्थ्यांप्रमाणे, ती मुलगी (पीडिता) देखील घरी यायची. तिला माहित होते की प्रोफेसर विवाहित आहेत आणि त्यांना मुलं आहेत, मग ती माझ्या नवऱ्याला कशी फसवू शकते? माझ्या पतीला स्किन सोरायसिस आहे. त्या मुलीनेच मला सांगितले होतं की खजुराहोमध्ये या आजारावर उपचार आहेत आणि म्हणून ती माझ्या पतीला तिच्यासोबत घेऊन गेली. मग ती त्याला बरसाना येथे घेऊन गेली. ती म्हणाली, "तिथल्या तलावात आंघोळ केल्याने आजार बरा होतो." कदाचित मुलीला माहित नसेल, पण माझ्या पतीने मला ते कोणासोबत जात आहेत आणि का जात आहेत याबद्दल सर्व काही सांगितलं होतं."

हे ही वाचा: राजकीय पक्षाच्या नेत्यावर महिलेसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप! थेट रॉडने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला अन्...

कविता म्हणाली, "माझ्या नवऱ्याने मला फसवलेलं नाही. ती मुलगी खोटी आहे. माझा नवरा निर्दोष आहे. माझ्या पतीला मोठा कट रचून अडकवण्यात आलं आहे. माझा नवरा मला सर्व काही सांगायचा. आता मी माझ्या नवऱ्यासाठी लढेन. त्या मुलीने केलेले सर्व आरोप खोटे आहेत. तिने माझ्या पतीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. माझ्याकडे त्या मुलीचे बऱ्याच लोकांसोबतचे चॅट्स आहेत आणि ते आता मी कोर्टात सादर करणार आहे."

    follow whatsapp