नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई तक

29 Jun 2026 (अपडेटेड: 29 Jun 2026, 09:01 PM)

Nasrapur rape case : नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात काय घडलं? जाणून घेऊयात..

Nasrapur rape case

Nasrapur rape case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

point

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

Nasrapur rape case : पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या धक्कादायक प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने हा गुन्हा "दुर्मिळातला दुर्मिळ" असल्याचे स्पष्ट केले. तसेच आरोपीने हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने केल्याचे तपासातून सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात आरोपीविरोधातील सातही गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले असून त्याआधारे ही कठोर शिक्षा सुनावण्यात आली.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'अपघाताची केस मर्डरची कशी झाली?' सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?

साधर्म्य असलेल्या 12 प्रकरणांचा संदर्भ देण्यात आला

निकाल देताना न्यायाधीशांनी सरकारी पक्षाने मांडलेल्या युक्तिवादाचा उल्लेख करत साधर्म्य असलेल्या 12 प्रकरणांचा संदर्भ देण्यात आल्याचे सांगितले. या 12 प्रकरणांपैकी अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयांनी फाशीची शिक्षा सुनावल्याचेही न्यायालयाने नमूद केले. तसेच बशर अली प्रकरणाचाही संदर्भ यावेळी देण्यात आला. या घटनेतील सर्व बिंदू एकमेकांशी जोडण्यात तपास यंत्रणांना यश आल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. मात्र आरोपी पीडितेसोबत नेमका का होता, हे स्पष्ट झाले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

हेही वाचा : वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीची इच्छा, मुलाने थेट 10 लाखांची दिली सुपारी अन्...

आरोपीने गुन्हा थंड डोक्याने केल्याचे सिद्ध

या प्रकरणाचा तपास अवघ्या 16 दिवसांत पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात करण्यात आली. तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या या प्रकरणात न्यायालयाने सर्व पुरावे आणि तपासाचा बारकाईने विचार करत अंतिम निर्णय दिला. तपासात आरोपीने गुन्हा थंड डोक्याने केल्याचे सिद्ध झाल्याचेही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणाचा निकाल देताना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने भीमराव कांबळेची केस "रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट" अर्थात दुर्मिळातल्या दुर्मिळ स्वरूपातील असल्याचे मान्य केले. त्यामुळे आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नसरापूर प्रकरणातील हा निकाल आज जाहीर करण्यात आला असून तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या या प्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेत अंतिम निर्णय दिला आहे.