पुण्यातून पाकिस्तानी तरुण ताब्यात, पोलिसांनी त्याला नेमकं कसं पकडलं?

मुंबई तक

15 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

Pakistani Man Living In Pune : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे शहरात एका पाकिस्तानी (Pakistan) तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पुण्यातील (Pune) खडक परिसरातून या पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेतले आहे. मोहम्मद अमान अन्सारी (Mohmad Aman Ansari) असे या 22 वर्षीय पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे. 8 मार्च रोजी पोलिसांनी ही कारवाई केली […]

Mumbaitak
follow google news

Pakistani Man Living In Pune : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे शहरात एका पाकिस्तानी (Pakistan) तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पुण्यातील (Pune) खडक परिसरातून या पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेतले आहे. मोहम्मद अमान अन्सारी (Mohmad Aman Ansari) असे या 22 वर्षीय पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे. 8 मार्च रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Pakistani youth detained from Pune, how exactly did the police catch him?)

हे वाचलं का?

मोहमंद अमन अन्सारी हा गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. इतक्या वर्षांपासून पाकिस्तानी तरुण भारतात राहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर यंत्रणा इतकी वर्ष काय करत होती, असा सवाल देखील सवाल यावेळी उपस्थित होत आहे. तो मागील आठ वर्षांपासून वेगवेगळी कामं करत होता. कोणतेही कागदपत्रे नसताना देखील हा तरुण पुण्यातील भवानी पेठेत राहत होता. या कारवाईनंतर त्या परिसरात खळबळ उडाली आहे.

PFI संबंधित सहाव्या आरोपीला जळगावातून अटक, ATS ची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्सारी हा 2015 सालापासून पुण्यातील भवानी पेठेत बेकायदेशीरपणे राहत होता. अवैधरित्या गेल्या 8 वर्षांपासून तो इथे तो वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक बनावट भारतीय पासपोर्ट आढळून आला. त्याने या पासपोर्टचा वापर करून दुबईला देखील प्रवास केला होता, असं देखील यातून समोर आले आहे.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खडक पोलिसात कलम 420, 468, 471, विदेशी व्यक्ती आधिनियम 1946 कलम 14 आणि पासपोर्ट आधिनियम 1967 कलम 12 (1A) a याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत असे नमुद केले आहे की, पोलिसांना या तरुणासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस मागील काही दिवसांपासून या तरुणाच्या मार्गावर होते. त्यात पोलिसांना तो खडक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सापळा रचून त्याला गजाआड केलं आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

मोहंमद अमान अन्सारी 8 वर्षापासून खोटे कागदपत्राच्या आधारे पुण्यात राहत होता. नेमका हा इतकी वर्ष पुण्यात काय करत होता याचा तपास आता सुरु आहे. त्याचबरोबर त्याने बनावट भारतीय पासपोर्टच्या माध्यामाने दुबईला जावून आला होता. नेमका दुबईला का गेला होता. त्याचे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, यांसारखे अनेक प्रश्न यादरम्यान उपस्थित होत आहेत.

कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?

    follow whatsapp