मुख्याध्यापकाकडून शारीरिक छळ! 15 वर्षीय विद्यार्थीनीने शाळेतच फाशी घेत संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमध्ये 'बॅड टच'...

मुख्याध्यापकाकडून होत असलेल्या शारीरिक छळाला कंटाळून एका खाजगी शाळेत 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने शाळेतच फाशी घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

विद्यार्थीनीने शाळेतच फाशी घेत संपवलं आयुष्य

विद्यार्थीनीने शाळेतच फाशी घेत संपवलं आयुष्य

मुंबई तक

• 11:00 AM • 26 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थीनीचा शारीरिक छळ!

point

15 वर्षीय विद्यार्थीनीने शाळेतच फाशी घेत संपवलं आयुष्य

point

सुसाइड नोटमध्ये लिहिलं 'बॅड टच'...

Crime News: मुख्याध्यापकाकडून होत असलेल्या शारीरिक छळाला कंटाळून एका खाजगी शाळेत 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने शाळेतच फाशी घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात घडल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमवारी (24 नोव्हेंबर) जशपूर जिल्ह्यातील बगीचा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात पीडितेने मुख्याध्यापकाकडून शारीरिक छळाला वैगातून शाळेच्या स्टडी रूममध्येच स्वत:ला संपवलं. 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटसुद्धा सापडली. 

हे वाचलं का?

स्टडी रूममने फाशी घेत संपवलं आयुष्य... 

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. घटनास्थळावरून पीडितेचा मृतदेह पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतर, तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पीडित तरुणीने साडीच्या साहाय्याने फाशी घेत स्वत:चं आयुष्य संपवलं. 

हे ही वाचा: मुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं पडलं महागात! ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली अन्... तरुणासोबत घडलं भयानक

सुसाइड नोटमध्ये 'बॅड टच' 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोटसुद्धा सापडली. यामध्ये मृत विद्यार्थीनीने शाळेच्या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा आरोप केला आहे.  आरोपी मुख्याध्यापकाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. पीडितेने सुसाइड नोटमध्ये 'बॅड टच' असं नमूद केलं आहे. सध्या, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा: तीन मुली झाल्यानंतर मुलाची अपेक्षा, पण चौथीही मुलगीच झाली; आईने तीन दिवसांच्या बाळाला गळा दाबून संपवलं

चौकशीदरम्यान, प्रकरणासंदर्भात अधिक माहिती मिळणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पीडित विद्यार्थीनी ही सरगुजा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेनंतर, एज्युकेशन आणि ट्रायबल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. 
 

    follow whatsapp